आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Kheer Puri Festival Sold A Million Liters Of Milk

‘खीरपुरी’मुळे दुधाची सत्तरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक- मुस्लिम धर्माचे सुफी संत हजरत इमाम जाफर सादिक (रजि.) यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा होणाऱ्या खीरपुरीच्या सणामुळे दुधाची मागणी वाढल्याने सोमवारी दर प्रतिलिटर ७० रुपयांच्या वर पोहचले होते. या सणामुळे जुन्या नाशकासह परिसरात एक लाख लिटरच्या अासपास दुधाची विक्री झाल्याची माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली.
रमजान ईद असो की कोजागिरी पाैर्णिमा, या सणाच्या निमित्ताचा फायदा घेऊन दूध व्यावसायिक दुधाचे अव्वाचे सव्वा पैसे ग्राहकांकडून घेतात, अशी तक्रार अाहे. मागणी वाढली म्हणून दरात वाढ केल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जाते. मंगळवारी (दि. १२) संत हजरत इमाम जाफर सादीक (रजि.) यांच्या स्मृतीदिनामित्त मुस्लिम बांधवांच्या घरी दुधाची खीर तयार करून फातेहा पठण केले जाणार आहे. खिरीसाठी लागणाऱ्या दुधाचे दर रात्री अाणखी वाढतील म्हणून अनेकांनी सोमवारी सायंकाळीच दूध बाजार, सारडा सर्कल, चौक मंडई, बागवानपुरा, भाभानगर, गंगापूररोड उपनगर परिसरात खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, सायंकाळपासूनच दूधाचे दर ७० रुपये झाले होते. रात्री उशिरापर्यंत तेच ७५ रुपयांपर्यंत पोहोचले. सण आल्यानंतर दुधाच्या दरात केल्या जाणाऱ्या या दरवाढीवर प्रशासनाने नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सामान्यांनी सण साजरा करायचा नाही का?
कोणताही सण आला, की दुधाचा व्यवसाय करणारे दर वाढवतात. ७०-७५ रुपये लिटरने दूध घेणे सामान्यांना परवडत नाही. त्यांनी सण साजराच करायचा नाही का?
- प्रकाश आहिरे, नागरिक