आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी घटल्याने कांदा दर साडेतीन हजार रुपयांवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आठवड्याच्या सुरुवातीला नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांदा दरात वाढ होऊन प्रति क्विंटल कमाल दर ४३०० पर्यंत गेला होता, तर किमान दर हा ३२०० पर्यंत होता. परंतु, महाराष्ट्रासह परराज्यातील किरकोळ बाजारातही दर ३५ ते ४० रुपयांपर्यंत गेल्याने ग्राहकांनी कांदा खरेदीकडे दुर्लक्ष केल्याने मागणीत घट झाली आहे. त्यामुळे बाजार समितीमध्येही कांदा दरात घसरण होऊन शनविारी कांद्याला प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० पर्यंत दर होता. तसेच कर्नाटकमध्येही काही प्रमाणात नवा कांदा येण्यास सुरुवात झाल्याने दर स्थिर आहेत. परंतु, मागणी वाढल्यास दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.

नाशिक जिल्ह्यातील उन्हाळ कांदा हा टिकाऊ असल्याने राज्यासह परराज्यातील कांदा व्यापारी साठवणूक करून ठेवतात. मात्र, यावर्षी गारपिटीमुळे कांद्यामध्ये पाणी गेल्याने कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या कांद्याच्या साठेबाजीला उधाण येण्याची शक्यता होती. मात्र, कांदा खराब होत असल्याने व्यापारीही रिस्क घेत नसल्याचे दिसत आहे. सध्या बांगलादेशात चीनचा कांदा विक्रीसाठी आला असल्याने भारतीय कांद्याची मागणी घटली आहे. परंतु, चीनचा कांदा पूर्णपणे खराब झाल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे.

आवक कमी
सध्याबाजार समितीमध्ये आवक कमी आहे, परंतु, मागणी घटल्याने दरात घसरण झाली. सोमवारी मागणी वाढल्यास दरात वाढ होऊ शकते. मुंबईलादेखील ३२०० ते ३५०० हेच दर आहे. -हर्षद शहा, कांदानिर्यातदार, मुंबई
बातम्या आणखी आहेत...