आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Seniors Officer Industrial Health In Serious Condition

वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अनास्थेने उद्योगांचे आरोग्य धोक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उद्योगांशी निगडित शासकीय विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या अनास्थेने नाशिक जिल्ह्यातील उद्योगांचे आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र मंगळवारी जिल्हा उद्योगमित्रच्या बैठकीत पाहायला मिळाले. या बैठकीस नेहमीप्रमाणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता, महापालिकेचे आयुक्त, बीएसएनएलचे जबाबदार अधिकारीही गैरहजर होते.

या बैठकीस वरिष्ठ अधिकारी उपस्थित न राहता ते दुय्यम अधिकार्‍यास पाठवितात, यामुळे समस्यांवर निर्णय घेता येत नाही. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील यांनी प्रयत्न केले.


तीन महिन्यांपासून बैठक नाही : या गोंधळामुळे 4 वाजताची नियोजित बैठक 5 वाजता सुरू झाली. बैठक सुरू होताच, आयमाचे उपाध्यक्ष विवेक पाटील, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष सतीश सिरोंजकर आणि महाउद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी जिल्हाधिकार्‍यांसह अनुपस्थित अधिकार्‍यांचा निषेध केला. दर महिन्याच्या तिसर्‍या मंगळवारी बैठक होणे क्रमप्राप्त असतानाही तीन महिन्यांपासून केवळ जिल्हाधिकार्‍यांची वेळ मिळत नाही म्हणून बैठक नाही. वेळ देऊनही जिल्हाधिकारीच अनुपस्थित असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. निषेध नाट्यानंतर तब्बल तीन तास बैठक चालली. अधिकार्‍यांचे एकमेकाला टोमणे आणि कनिष्ठ अधिकार्‍यांनी प्रश्नांचा अभ्यास न करता वेळ मारून नेण्यासाठी दिलेली उत्तरे त्यातून उद्योजकांचा संताप पाहायला मिळाला. पालिकेशी निगडित काही प्रश्न सोडले तर इतर प्रश्न पुढील बैठकीत चर्चेस येणार आहेत. काकुस्तेंनी काही प्रश्नांसाठी संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.
काकुस्ते तासभर होल्डवर
जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्याशी साहेबराव पाटील यांनी चर्चा करून त्यांच्या सोयीनुसार बैठकीच्या दोन तारखाही बदलल्या. मात्र, तरीही या बैठकीला ते आले नाही. अपर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे मंत्रालयीन कामकाजासाठी मुंबईत गेल्याने बैठकीला उपस्थित राहण्याची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांच्यावर आली. मात्र, जिल्हाधिकारीच नसल्याने बैठक घेण्यात येऊ नये, असा पवित्रा उद्योजकांनी घेतला. काकुस्ते यांनी बैठकीला येणे उद्योजकांना मान्य नसल्याचे साहेबराव पाटील यांनी त्यांना कळविल्याने काकुस्ते एक तास होल्डवर होते. त्यानंतर एमआयडीसीचे प्रादे-शिक अधिकारी रामदास खेडकर यांनी काकुस्तेंना बोलाविले.
तुपे यांना समज देण्याचा ठराव
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. आर. तुपे बैठकीत उडवाउडवीची उत्तरे देतात, पाठपुरावा करत नाहीत, वेळ मारून नेतात, असा आरोप निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी करत त्यांना कडक समज देण्याचा ठराव करण्यास भाग पाडले.