आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: तीन नवीन समित्यांमुळे भाजप नगरसेवकांना ‘अच्छे दिन’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: महापालिकेत सहजपणे सत्ता प्राप्त केलेल्या भाजपच्या नगरसेवकांना पद मिळाल्याने नाराजी, धुसफूस यासाठी फारशी संधीच राहणार नसून महापाैर, उपमहापाैर, स्थायी समिती सभापती अाणि तीन प्रभाग समित्यांबराेबरच यंदा खास स्थापन झालेल्या विधी, शहर सुधार आरोग्य या तीन समित्याही सत्ताधाऱ्यांच्याच खिशात जाणार अाहेत. या तीन समिती सदस्यांची निवड १८ मे रोजी सकाळी ११.३० वाजता हाेणार असून संख्याबळानुसार नऊ सदस्य असलेल्या समितीत भाजपचे पाच सदस्य सामावले जाणार अाहेत. परिणामी, सभापतीही भाजपचाच हाेणार अाहे. 
 
महापालिकेत यापूर्वी काेणा एका पक्षाला बहुमत नव्हते. त्यामुळे महत्त्वाची पदे मिळवण्यासाठी संघर्ष, स्पर्धा, विविध प्रकारे प्रयत्न नेहमीचेच हाेते. त्यात यश अाल्यास असंताेष, नाराजी, धुसफूसही हाेत हाेती. सत्तेसाठी कुबड्या घेताना सहकारी पक्षांना खुश ठेवताना घरातील सदस्यांनाही समाधानी ठेवण्याची तारेवरची कसरत करावी लागत हाेती. 

यावेळी मात्र भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे ‘पाचही बाेटे तुपात’ अशीच त्यांची परिस्थिती अाहे. भाजपचे ६६ नगरसेवक निवडून अाले असून महत्त्वाची पदे, वाढीव समित्या लक्षात घेत पदांची खिरापत प्रत्येकाच्याच हातात पडेल, अशी स्थिती अाहे. सद्यस्थितीत भाजपकडे महापाैर, उपमहापाैर, स्थायी समिती असून या ठिकाणी सर्वाधिक सदस्यही याच पक्षाचे अाहेत. स्थायीवर नऊ सदस्य भाजपचे गेले असून ६६ पैकी १२ नगरसेवक पहिल्या टप्प्यात खुश झाले अाहेत. दुसऱ्या टप्प्यात महिला बालकल्याण समितीवर पाच सदस्य भाजपचे असून येथेही सभापती भाजपचाच हाेणार अाहे. थाेडक्यात, १७ नगरसेवकांचा विषय संपला अाहे. त्यानंतर शिक्षण समिती, विधी, शहर सुधार अाराेग्य अशा चार समित्यांमध्ये भाजपच्या जवळपास २४ नगरसेवकांना स्थान दिले जाणार अाहे. यातील चार सदस्यांना सभापती हाेण्याची संधी अाहे. त्यानंतर सहा प्रभाग समित्यांपैकी पंचवटी, नाशिकराेड नाशिक पूर्व भाजपच्या ताब्यात येणार असून येथेही माेठ्या प्रमाणात सदस्यांचे समायाेजन हाेणार अाहे. थाेडक्यात, यंदाच्या पंचवार्षिकमध्ये बहुतांश नगरसेवकांना महत्त्वाची पदे मिळतील, अशी स्थिती अाहे. 
विधी, शहर सुधार आरोग्य या तीन विशेष समित्यांच्या स्थापनेची तयारीही भाजपने सुरू केली आहे. महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली १८ मे राेजी होत असलेल्या महासभेत या समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती घोषित केली जाणार आहे. 
 
काँग्रेस-राष्ट्रवादीचा पुन्हा समझाेता 
महिला बालकल्याण समितीच्या धर्तीवर नऊ सदस्यांच्या तिन्ही समित्या असल्यामुळे येथे भाजपचे सरळ पाच, शिवसेनेचे तीन तर एक जागा काँग्रेस राष्ट्रवादीचे समान संख्याबळ असल्यामुळे त्यांना वाटून घ्यावे लागणार अाहे. विराेधकांनी अपक्षांसह एकत्र माेट बांधली असल्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अापल्या काेट्यातून काेणाला संधी देतात हे बघणे उत्सुकतेचे अाहे. तसे झाले तर मनसे अपक्षांना संधी मिळू शकते. दरम्यान, सदस्य नियुक्तीपूर्वी समित्यांवर काेणाचे किती सदस्य जाऊ शकतात, याचे गणित समजावण्यासाठी महापाैर गटनेत्यांची बैठक बाेलावणार अाहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...