आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैशाख अमावास्येनिमित्त एसटीच्या 30 जादा बस, उन्हाळी सुट्यांमुळे प्रवाशांमध्ये वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वैशाख अमावास्येनिमित्त परिवहन महामंडळातर्फे नाशिकमधून ३० जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर शिर्डी येथून मुंबई आणि ठाण्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होण्याची दाट शक्यता असल्याने परतीच्या प्रवासाठी जादा बसेस या शनिशिंगणापूर ते मुंबईमार्गे शिर्डी मार्गावर धावणार आहेत. १७ १८ मे या दोन दिवसांसाठी जादा बसेसचे हे नियोजन करण्यात आले.

उन्हाळ्याच्या सुट्या आणि लग्नसराई निमित्त एप्रिल ते ३० जूनदरम्यान वाढणारी प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन एसटीने नियोजन केले आहे. ठक्कर बाजार, मध्यवर्ती बसस्थानक, नाशिकक रोड बसस्थानके हाऊसफुल्ल झाली आहेत. येत्या दोन आठवड्यांमध्ये प्रवाशांच्या संख्येत आणखी ४० टक्के वाढ होईल, अशी अपेक्षा एसटीचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.
ठक्कर बाजार आणि मध्यवर्ती बसस्थानकावरून दररोज ते १० हजार प्रवासी ये-जा करतात.
ठक्कर बाजार येथील बसस्थानकावरील प्रवाशांच्या आकड्यात चार ते पाच आणि मध्यवर्ती बसस्थानकावरील प्रवाशांच्या संख्येत तीन ते चार हजारांची वाढ झाली आहे. नस्तनपूरसाठीपाच बस : वैशाख अमावास्येनिमित्त शनिशिंगणापूर सोबतच नस्तनपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी पाच जादा बसेस सोडण्यात येणार आहे. दिवसभर या पाच बसेस फेऱ्या मारणार असून, दोन वाहतूक नियंत्रकांची जादा वाहतुकीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.

शनिशिंगणापूरसाठी बस
नाशिकमधील आगार क्रमांक एक दोनमधून शनिशिंगणापूरसाठी प्रत्येकी पाच बसेस सोडण्यात येणार आहे. तर सिन्नर, पेठ, इगतपुरी, कळवण, पिंपळगाव बसवंत, मालेगाव, मनमाड, सटाणा, लासलगाव आणि येवला आगारातून प्रत्येक दोन जादा बसेस सोडण्यात येणार आहे.