आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Due To Water Pollution Farmers Devastated Rajendra Singh

जलप्रदूषणामुळेच शेतकरी देशोधडीला - राजेंद्र सिंह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी - शेतीसाठी पाणी हे प्रमुख स्त्रोत असून, मागील काही दशकापासून जमिनीवरील पाण्याचे स्त्रोत असलेल्या नद्या प्रदूषित झाल्या आहेत. त्यामुळे जमीन ही नापिक होत अाहे. शेतकऱ्यांना वाचवायचे असेल तर जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबण्याची प्रमुख गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले.

कृषी महोत्सवात ‘दृष्काळ शेती पुढील समस्या’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. ते म्हणाले की, प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख होती. राज्यातील नद्या बारमाही वाहत होत्या. आज लहान नद्या कोरड्या पडल्या असून, मोठ्या नद्या दूषित झाल्या आहेत. औद्योगिक वसाहतीचे दूषित पाणी नद्यांमध्ये येत असल्याने विपरीत परिणाम शेतीवर होत आहे. तेच पाणी शेतकरी उपसा करून वापरत आहेत. त्यातून शेती नापिक होत असल्याचे वास्तव आहे. एका बाजूला पर्यावरणाच्या हानीमुळे अाेढावलेले संकट आणि दुसऱ्या बाजूला नापिकी यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या समस्येवर वरवर उपाय करण्यापेक्षा नदी प्रदूषण थांबवून प्रभावी योजना राबविण्याचे गरज असल्याचे सिंह म्हणाले.

सौरऊर्जा शास्त्रज्ञ आनंद कुलकर्णी यांनी पारंपरिक ‘ऊर्जास्त्रोत’ या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. आनंद फिस्के यांनी बांबूशेतीतून शेतकऱ्यांना कशाप्रकारे आर्थिक लाभ होतो, याची सखोल माहिती दिली. चर्चासत्रात दीपक कान्हेरे, शशिकांत मेहेत्रे, गिरीधर पाटील, आयोजक आबासाहेब मोरे अादी उपस्थित होते.

सुटी लावली सत्कारणी
कृषी प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी उपयोग स्टाॅल, शेती अवजारे, फळे, भाजीपाला आणि तांदूळ हे विक्रीला असल्याने शहरवासीयांनी रविवारची सुटी आपल्या मुलांसह कृषी प्रदर्शनात घालविल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मुलांना आपल्या परंपरेची माहिती व्हावी, म्हणून प्रदर्शनामध्ये बारा बलुतेदारांचे गाव हे माहितीपूर्ण असल्याने पालक आपल्या मुलांना त्याची माहिती करून देताना दिसत होते.