आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाईमुळे दिवसाला एका शहरवासीयाला डेंग्यूचा डंख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी साेडल्यामुळे नाशिक शहराला एकीकडे पाणीटंचाईच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागत असताना, या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पाणी साठवणूक करण्याची बाब नाशिककरांसाठी धाेकेदायक ठरत असल्याचे मत वैद्यकीय विभागाकडून व्यक्त हाेत अाहे. साठवलेल्या पाण्यामुळे डेंग्यूच्या प्रसाराचा धाेका वाढला असून, जून महिन्यात १४ दिवसांत डेंग्यूचे तब्बल १५ रुग्ण अाढळले अाहेत.

थंडीत डाेके वर काढणाऱ्या डेंग्यूने यंदा उन्हाळा पावसाळ्याच्या कालावधीत धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केल्याचे चित्र अाहे. म्हणूनच की काय, गेल्यावेळी जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत जेथे डेंग्यूचे सहा रुग्ण हाेते, त्याच कालावधीत अाता ८० रुग्ण अाढळले अाहेत. मे महिन्यात तब्बल ३३ डेंग्यूबाधित रुग्ण अाढळले असून, ६८ नमुने घेतल्यानंतर त्यापैकी ३४ डेंग्यूबाधित सापडले अाहेत. जून महिन्यात ३१ नमुने घेतले असून, त्यात १७ डेंग्यूबाधित अाढळले अाहेत. मागील वर्षी मे महिन्यात एकही डेंग्यूचा रुग्ण नव्हता, तर जूनमध्ये अवघे सहा रुग्ण अाढळले हाेते. दरम्यान, अतिसाराचे ४३५, काविळीचे ९, विषमज्वरचे ३७ रुग्ण अाढळले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...