आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dugarwadi Waterfall Can Prove Lifetime Water Sourse For Marathwada

दुगारवाडी धबधबा ठरेल मराठवाड्याचा तारणहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- त्र्यंबकमध्ये डोळ्याचे पारणे फेडणा-या दुगारवाडी धबधब्याचे पाणी गंगापूर धरणात आणण्यासाठी जलसंपदा विभागाने 275 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला असून प्रकल्प मार्गी लागला तर गुजरातमध्ये वाहून जाणारे जवळपास 1 हजार दशलक्ष घनफूट पाणी गोदावरीत येऊन दुष्काळाच्या झळा सोसणारा मराठवाडा व नाशिककरांना दिलासा मिळेल.

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खो-यात वळवण्यासाठी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. सूत्रांनुसार, या प्रस्तावित कळमुस्ते प्रकल्पाव्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यात 27 प्रवाही वळण योजना राबवल्या जात आहेत. यातील 19 योजना यशस्वी झाल्या तर 2321 द.ल.घ.फूट पाणी गोदावरी खो-यात येईल. त्यामुळे मराठवाडा, नगरच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटू शकेल. याशिवाय दुगारवाडी धबधबा बारमाही होऊन पर्यटनाला चालना मिळेल.

विंधन विवर पूर्ण
३ 275 द.ल.घ.फू साठवण क्षमतेच्या कळमुस्ते प्रकल्प सर्वेक्षणाचे काम पूर्ण.
३ दुगारवाडी धबधब्याच्या माथ्यावर हा प्रस्तावित प्रकल्प असून दमणगंगेचे पाणी गोदावरीत वळवले जाईल.
३ विंधन विवरांचे काम पूर्ण. कळमुस्ते प्रकल्पात पाणी आल्यानंतर 12 ते 15 किमीच्या बोगद्यातून पाणी गौतमी-गोदावरी संगमाजवळ आणले जाईल.

आशेचा नवा किरण
या धबधब्यातून पडणारे पाणी दमणगंगा व नंतर थेट गुजरातकडे जाते. गोदावरीचे उगमस्थान असूनही नाशिकमध्ये दुष्काळ आहे. तसेच नगर व मराठवाड्यातही भीषण दुष्काळ आहे. म्हणूनच कळमुस्ते प्रकल्प आशेचा नवा किरण ठरला आहे.