आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्या प्राण्यांच्या रक्षणाचा रॅलीद्वारे संदेश, इंडिया युनाइटस फाॅर अॅनिमल्सतर्फे अायाेजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुक्याप्राण्यांवर वाढते अत्याचार रोखावे, प्राण्यावरील क्रुरता थंाबविण्यासाठी प्राणी संरक्षण सुधारणा विधेयकास तातडीने मंजुरी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्राण्यांच्या संरक्षणाकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी इंडिया युनाइट्स फॉर अॅनिमल्सच्या माध्यमातून शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.
मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन व्हावे, यासाठी असलेल्या कायद्यांची शासनाने कडक अंमलबजावणी करावी यासाठी इंडिया युनाइट्स फॉर अॅनिमल्स संस्थेच्या माध्यमातून रविवारी (दि. १८) डोंगरे वसतिगृह मैदानापासून रॅली काढण्यात आली. या रॅलीत अभिनेता चिन्मय उदगीरकर, नमिता कोहक, ब्लॉगर संतोषी शेट्टी, शिशिर शिंदे मान्यवरांच्या हस्ते रॅलीला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. प्राण्यांना कायद्याची साथ मिळाली. अत्याचार रोखा, प्राण्यावर प्रेम करा अशा घोषणाा देत या रॅलीत अनेक प्राणीप्रेमी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या रॅलीदरम्यान कायद्यास पाठिंबा मिळावा यासाठी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली. रॅलीत शरण, गीव्ह, मानव उत्थान मंच, राष्ट्रीय एकता मंच, ग्रीन गार्डस, इको-एको, हौसला, आवास, येस, नाशिक सायकलिस्ट असोसिएशन, मारवाडी युवा मंच, जैन साेशल ग्रुप, महावीर इंटरनॅशनल, जैन मायनॉरिटी, रोटरी क्लब, पार्किंसन्स, नेचर क्लब संस्थेचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. भोंसला महाविद्यालयाजवळ या रॅलीचा समाराेप करण्यात आला.
मुक्या प्राण्यांना संरक्षण देण्यासाठी प्राणी संरक्षण विधेयक मंजूर करावे, या मागणीसाठी रविवारी प्राणीमित्रांनी शहरात रॅली काढली.
बातम्या आणखी आहेत...