आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट चाव्यांनीच झाल्या सर्वाधिक घरफोड्या

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात गेल्यावर्षी 367 रात्रीच्या घरफोड्या, 72 दिवसा घरफोड्या तसेच 988 वाहनांची चोरी झाल्याची नोंद विविध पोलिस ठाण्यांमध्ये आहे. यात बहुतेक ठिकाणी बनावट चाव्यांचा वापर केल्याचे पोलिस तपासात निदर्शनास आले आहे.
सध्या शहरात चो-या, जाळपोळ, घरफोड्यांचे पेव पसरले आहे. चार- पाच दिवस घर बंद दिसले तर बनावट चाव्यांच्या साहाय्याने घरफोडी करण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरात सिडको, अंबड, सातपूर नाशिकरोड भागात बनावट चाव्या बनविणारे कारागीर असून, त्यातील बहुतांश परराज्यातून आले आहेत. कुलूप उघडण्यासाठी बनावट चाव्यांचाच आधार घेतला जातो. तसेच जे कुलूप उघडले जात नाही, तेथील कडी-कोंयडे तोडून चो-या झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
चावी बनविणा-या कारागिरांवर अनेक बंधने आहे. त्यामध्ये साबणाच्या शिक्क्यानुसार चावी बनवून देणे अयोग्य आहे. तसेच चावीचा फोटो किंवा मोबाइलमधील फोटोवरून चावी बनवून देणेही बेकायदेशीर आहे. घराच्या कुलपाची किंवा घरातील कपाटाची चावी बनवायची असेल तर स्वत: तेथे थांबणे महत्त्वाचे आहे.
खात्री झाल्यावरच चावी - आम्ही विचारपूस न करता कोणालाही चावी बनवून देत नाही. ज्यांच्या घराची चावी हरवली असेल तर शेजारील किंवा इमारतीतील नागरिकांना विचारून घेतो की, या घराचे मालक हेच आहेत का? खात्री झाल्यानंतरच चावी बनवून दिली जाते. - बाळासाहेब जाधव, अध्यक्ष नाशिक जिल्हा चावीवाले संघटना
वेळोवेळी चौकशी - चावी बनाविणा-या कारगिरांची वेळोवेळी चौकशी केली जाते. चावी कारागिरांना महापालिकेतर्फे परवाना दिला जातो. - गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त
मास्टर चावी थोतांड - मास्टर चावीने सर्व कुलपे उघडली जातात, हे एक थोतांड आहे. असे असते तर सर्व दुकांनात चो-या झाल्या असत्या. - दादा देशमुख,चावी कारागीर