आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताेतया पाेलिसांनी पळवून नेली होमगार्डची दुचाकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - टाकळीयेथून दोन तोतया पोलिसांनी होमगार्डची फसवणूक करून त्याची दुचाकी पळवून नेली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळी येथील समतानगर चौफुलीवर रविवारी सायंकाळी कैलास देवराम दराणे आणि सारिका घोडेकर हे दोघे होमगार्ड बंदोबस्तावर हाेते. याचदरम्यान एक व्यक्ती येऊन ‘मी उपनगर पोलिस ठाण्यात डी.बी.ला आहे. आताच नांदेडहून बदलून आलो आहे, त्यामुळे तुम्ही मला ओळखत नाही. नाव काय तुझे, काही कमवितो की नाही अजून, चल आपण पेट्रोलिंग करून येऊ, गाडी घे तुझी’ असे म्हणाली. यावेळी होमगार्ड कैलास दराणेने आपली दुचाकी (एम.एच.१५ सी.क्यू. ३५१६) काढली, त्यावेळी संबंधित व्यक्तीने दराणेकडून दुचाकी स्वत: चालविण्यास घेतली. थोडे पुढे गेल्यानंतर त्याने अाणखी एकाला साेबत घेतले. तिघेही तपोवनमार्गे निघाले. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांना हात देत आपला माणूस आहे, याच्याकडे लक्ष राहू द्या असे म्हणत विश्वास प्राप्त केला. चल आता आपण रेल्वे स्टेशनवर बंदोबस्त पाहू, असे म्हणत तिघेही स्टेशनवर गेले. यावेळी स्थानकात झोपलेल्या प्रवाशांकडे तिकिटांची विचारणा करू लागले. सोबत होमगार्ड उभा होता. याचवेळी रेल्वे पोलिस पायी गस्त घालत असताना त्यांनी विचारणा केली. त्यावेळी या तोतया पोलिसांनी दुचाकीसह धूम ठोकली. होमगार्ड दराणेच्या हा प्रकार लक्षातच येत नव्हता. रेल्वे पोलिसांनी दराणेची अधिक चौकशी केली असता त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर तोतया पोलिस असल्याचे समोर आले.

एक संशयित ताब्यात
उपनगर पोलिसांनी केलेल्या तपासात राजेश भास्कर शार्दुल बंडू सोलंखे (रा. समतानगर) असल्याचे उघड झाले. त्यापैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले तर एक जण दुचाकीसह फरार आहे. उपनगर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
बातम्या आणखी आहेत...