आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्ग साहित्य संमेलन यंदा सिंहगडावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड- सिंहगडावरपाचवे दुर्ग साहित्य संमेलन २० ते २२ फेबुवारीदरम्यान हाेणार अाहे. गाेनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी या संमेलनाचे अायाेजन केले जाते. महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक अाणि ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डाॅ. अरविंद जामखेडकर हे संमेलनाचे अध्यक्ष असून, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे निमंत्रक अाहेत, तर जयप्रकाश सुराणा संमेलनाचे स्वागताध्यक्ष अाहे.
सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी अातकरवाडीतील ‘गप्पांगण’येथे हाेणाऱ्या या तीनदिवशीय साेहळ्यात ग्रंथदिंडी, उद‌्घाटन, समाराेप साेहळ्यासह दुर्ग विषयक परिसंवाद, व्याख्यान, चर्चासत्र, मुलाखत, कांदबरी अभिवाचन, माहितीपट, िसंहगड दर्शन, गाेनीदांच्या कांदंबरीचे अभिवाचन, विविध स्पर्धा अाणि सांस्कृतिक कार्यक्रम हाेणार अाहे.
संमेलनात दुर्ग अाणि निसर्ग परिसंवादात डाॅ. श्रीकांत इंगळहळ्ळीकर, डाॅ. अानंद पाध्ये, डाॅ. सतीश पांडे, डाॅ. हेमंत घाट, महेश तेंडुलकर, सदाशिव टेटविलकर, डाॅ. गाे. बं. देगलुरकर सहभागी हाेणार अाहे. ५० वर्षापुर्वी ‘दहा दिवस दहा दुर्ग’या माेहिमेतील सहभागी ज्येष्ठ दुर्गराेहींशी अाणि िसंहगडाचे वारस या विषयांतर्गत नरवीर तानाजी मालुसरे, नावजी बलकवडे अाणि लाेकमान्य टिळक यांच्या वंशजांशी चर्चा संमेलनाचे अाकर्षण अाहे. तसेच गाेनीदांच्या पवनाकाठचा धाेंडी या कांदबरीचे अभिवाचन डाॅ. विजय देव, डाॅ. विणा देव अाणि रुचिर कुलकर्णी हे करणार अाहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दुर्गविषयक मुलाखत, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे गनिमी काव्याचे युध्द या विषयावर व्याख्यान हाेणार अाहे. अधिक माहितीसाठी संजय अमृतकर (९९६००१०००९) विशाल देशपांडे (९८८१७१८१०४) यांच्याशी संपर्क साधण्याचे अावाहन करण्यात अाले अाहे.
सदाशिव टेटविलकरांना दुर्ग साहित्य पुरस्कार-
दुर्गसाहित्य पुरस्कार यंदा महाराष्ट्रातील गडकाेट अाणि अन्य एेतिहासिक स्थळांवर प्रदिर्घ लेखन करणारे ठाण्याचे ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांना प्रदान केला जाणार अाहे.