आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गा, किसनची वर्ल्ड स्कूल इंटरनॅशनलमध्ये सुवर्णपदकांची कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चीनमधील वुहान येथे सुरू असलेल्या वर्ल्ड स्कूल इंटरनॅशनल स्पर्धेत नाशिकच्या दुर्गा देवरेने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत स्वत:चा विक्रम माेडीत काढून सुवर्णपदकाची कमाई केली. किसन तडवीनेही ३००० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत जागतिक नकाशावर पुन्हा एकदा नाशिकचे नाव झळकावले.

दुर्गाने स्पर्धेत प्रारंभापासून प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत अाघाडी घेत ती अखेरपर्यंत कायम राखली. तिने मिनिटे ३४ सेकंद ०५ शतांश सेकंदांचा पूर्वीचा विक्रम माेडून मिनिटे ३३ सेकंद अाणि ६६ शतांश सेकंदांची सर्वोत्तम व्यक्तिगत कामगिरी नोंदविली. किसन तडवीने ३००० मीटरचे अंतर मिनिटे ३२ सेकंद ५९ शतांश सेकंदांत पूर्ण करीत सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी २०१२ मध्ये झालेल्या वर्ल्ड स्कूल स्पर्धेत नाशिकच्याच अंजना ठमकेने सुवर्णपदक पटकावले हाेते. तिनेदेखील ही स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण केली हाेती.
बातम्या आणखी आहेत...