आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्कलला फास, वाहतूक कोंडीमुळे रोखला श्वास, वजड वाहने जातात महामार्गावरूनच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुने नाशिक- मुंबई-आग्रामहामार्गाच्या रुंदीकरणांतर्गत उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलानंतर तरी द्वारका सर्कल भागातील वाहतूक कोंडीचा बिकट प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, या नाशिककरांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे. वाहतूक नियंत्रणापुरते उरलेले वाहतूक पोलिस, रस्त्यांवरील पार्किंग आणि पर्यायी मार्गांबाबत वाहनधारकांत असलेली अनभिज्ञता यामुळे ही समस्या कायम आहे.
तिगरानिया चौफुली परिसर ते थेट मुंबई नाक्यापर्यंत महामार्गाच्या समांतर असलेल्या सर्व्हिसरोडवर सर्रासपणे अवजड वाहनांची पार्किंग केली जाते. या वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून नेहमीप्रमाणे सोयीस्कर दुर्लक्षच केले जात आहे. त्यामुळे या इच्छा असतानाही वाहनधारक या रस्त्यांवरून मार्गक्रमण करू शकत नाहीत. परिणामी, त्याचा थेट परिणाम मुख्य मार्गावरील वाहतुकीवर होतो आणि वाहनांच्या गर्दीत भर पडून येथे कोंडी होते. त्यामुळे रस्त्यावर थांबणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होते आहे. मात्र, त्याकडेही पोलिसांचे लक्ष नाही. कारवाई केली तरीही ती दिखावू ठरते.

उड्डाणपुलाच्या उभारणीनंतर तरी वाहनधारकांची या कोंडीतून सुटका होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आजही या सर्कल परिसरातील कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या अर्धा-अर्धा किलोमीटर लांब रांगा लागत असल्याचे चित्र नित्याचेच बनले आहे. वाहनधारकांना वाट शोधण्यासाठी ताटकळत राहावे लागते. या समस्येकडे पोलिस पालिका प्रशासनासह महामार्ग विभागानेही गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या कायमस्वरूपी सुटण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.