आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्वारका सर्कलवरील कोंडी सुुटण्याची चिन्हे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या सूचनांनुसार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्वेक्षण करून प्रादेशिक कार्यालयाला चार पर्याय सुचविले अाहेत. त्यानुसार दिल्लीतील मुख्यालय याबाबत निर्णय घेणार असून, लवकरच नाशिककरांना येथील वाहतूक काेंडीपासून मुक्ती मिळण्याची चिन्हे अाहेत.
द्वारका सर्कल येथे येऊन मिळणाऱ्या सात रस्त्यांमुळे शहरवासीयांना माेठ्या प्रमाणावर वाहतूक काेंडीचा सामना करावा लागताे अाहे. त्यामुळे येथील तो वाया जाणारा वेळ अपघात राेखण्यासाठी उपाय करण्याची मागणी खासदार हेमंत गाेडसे यांच्यासह शिष्टमंडळाने गडकरी यांच्याकडे केली हाेती.येथील पादचारी मार्गाचा वापर हाेत नसून, त्याची अवस्था स्वच्छतागृहाप्रमाणे झाली अाहे. मुंबई नाका द्वारका सर्कल परिसरात ‘बॉटल नेक’ तयार हाेत असून, वाहतुकीची समस्या गंभीर बनली अाहे. त्यामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी वाहतूक काेंडीवर उपाय करण्यात यावेत, याकरिता दिल्लीत खासदार हेमंत गाेडसे यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर महिन्यात शिष्टमंडळाने गडकरींची भेट घेतली हाेती. त्यानुसार गडकरींनी महामार्ग प्राधिकरणाला उपाय याेजण्याचे अादेश दिले हाेते. त्यानुसार वाहतूकतज्ज्ञांचेही मत अाजमावण्यात अाले सर्वेक्षण केले गेले. दीर्घकालीन फायदा हाेऊ शकेल असे पर्याय अमलात अाणण्यासाठी चार पर्याय सुचविण्यात अाले अाहेत, लवकरच त्यांची अंमलबजावणी सुरू हाेईल, जेणेकरून नाशिककरांचा वेळ वाहतूक काेंडीत जाणार नाही आणि मनुष्यहानीही टळू शकणार अाहे.
खासदार गाेडसेंनी सुचविलेला पर्याय
नाशिकराेड ते सीबीएस हा चारपदरी रस्ता संपूर्ण द्वारका सर्कलसाठी अंडरपास करणे, नाशिकराेड-सीबीएस या चारपदरींपैकी दाेन पदरी रस्ता अंडरपास करून चारचाकी वाहने जातील उर्वरित दाेन पदरी रस्त्यावरून अवजड वाहने जातील. यात पादचारी मार्ग मात्र नष्ट करावा लागणार असून, त्याएेवजी ‘स्काय वे’चा पर्याय पादचाऱ्यांना उपलब्ध करून द्यावा लागेल.
या नकाशात दर्शविल्याप्रमाणे नाशिकराेेड ते सीबीएस रस्त्यावरील द्वारका सर्कल येथील काेंडी फाेडण्यासाठी जाणाऱ्या अाणि येणाऱ्या मार्गावरील प्रत्येकी एक लेन भूमिगत करून त्यातून हलकी वाहने, तर उर्वरित वरून जाणाऱ्या दाेन लेनमधून अवजड वाहतुकीचा पर्याय सुचविला गेला अाहे.
महामार्ग प्राधिकरणाने सुचविलेले पर्याय
{द्वारका सर्कलला जाेडणाऱ्या शहरातील सर्व रस्त्यांवर सिग्नल लावण्यात यावेत.
{शालिमार ते नाशिकराेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० मुंबई-अाग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक या दाेन रस्त्यांना सिग्नल लावण्यात यावेत.
{नाशिकराेड ते सीबीएस हा चारपदरी रस्ता संपूर्ण द्वारका सर्कलसाठी अंडरपास करणे.
{के. के. वाघ महाविद्यालय ते जत्रा हाॅटेलपर्यंतचा उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित अाहे. त्यामुळे येथील वाहतूक काेंडी सुटू शकेल.

सर्वेक्षणात काय अाढळले...
{ पुणे अाणि सीबीएसकडे जाणारी वाहतूक : ३० टक्के
{ पिंपळगाव - सीबीएसकडे जाणारी वाहतूक : १५ टक्के
{ सर्कलवर वळसा घेऊन जाणारी वाहतूक : २५ टक्के
{ एकूण वाहनांपैकी : ७० टक्के प्रमाण कार, हलक्या वाहनांचे