आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दुचाकींच्या धडकेत युवक ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - द्वारकाकडून गंजमाळकडे येणार्‍या दुचाकीने सारडा सर्कल चौकातून रस्ता ओलांडणार्‍या दुचाकीस समोरासमोर धडक दिल्याने शुक्रवारी झालेल्या अपघातात युवक जागीच ठार झाला, तर दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख असिफ कासीम (वय 18, रा. चौकमंडई) हा अहमद महेमूद आलम शेख (21, रा. काझीपुरा) या मित्रासोबत दुचाकीने (एमएच 15 सीबी 7145)द्वारका येथून गंजमाळच्या दिशेने येत असताना सारडा सर्कल चौकात समोरून रस्ता ओलांडणार्‍या दुचाकीस जाऊन धडकला. दोघाही दुचाकीस्वारांचे वेगावर नियंत्रण नसल्याने ते दूरवर फेकले गेले. यामध्ये समोरील दुचाकी (एमएच 15 बीसी 9912) वरील एजाज कोकणी यास गंभीर दुखापत झाली.

या अपघातात जखमी झालेल्या शेख असिफ यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, एजाज कोकणी व अहेमदरजा या दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.