आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Each MLA Should Be Give 20 Lakh For The Sanitation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वच्छतागृहांसाठी प्रत्येक आमदारास द्यावे लागणार वीस लाख रूपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आगामी सहा महिन्यांत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सततच्या पाठपुराव्यामुळे राज्यातील सार्वजनिक स्वच्छतागृह अद्ययावत होणार आहेत. त्यासाठी आमदारांना वीस लाख रुपये निधी देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याचे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा आमदार विद्याताई चव्हाण यांनी सांगितले. राज्य परिवहन मंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे आणि आमदार चव्हाण यांनी नाशिक विभागातील पाचही विभाग नियंत्रकांची बैठक घेतली. या वेळी संबंधित अधिकार्‍यांना बसस्थानकावरील स्वच्छतागृहांची दुरुस्ती तत्काळ करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आमदार चव्हाण म्हणाल्या.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमासाठी पक्षाच्या सर्व आमदारांना हा निधी देण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात सर्व सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, न्यायालये इत्यादी सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतागृहे सुस्थितीत असतील. आवश्यक तेथे त्यांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. या कामावर पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन आमदार चव्हाण यांनी केले.

रेशनच्या वाटपावर लक्ष ठेवणे, नागरी हिताचे विविध प्रश्न समजावून घेऊन त्यावर वरिष्ठांच्या मदतीने निर्णय घेणे, गोरगरिबांना इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. त्यानंतर नाशिक जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसची भुजबळ फार्म येथील कार्यालयात बैठक झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार होते. या वेळी महिला प्रदेश पदाधिकारी संजीवनी शंृगारे, जिल्हा शाखेच्या अध्यक्षा शोभाताई मगर, युवती जिल्हा समन्वयक किशोरी खैरनार, कोकीळाताई वाघ, महिला तालुकाध्यक्ष रेखाताई शिंदे ,संध्या भगत, पूनम गवळी, सोनिया जावळे, सुनीता जाधव, लीनाताई आहेर, महिला शहराध्यक्ष शकुंतला बागुल, कल्पना रेवगडे, सुरेखा पर्‍हे, वंदना भामरे, शीतल रहाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.