नाशिक - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून मराठवाड्याला पाणी साेडल्याने शिल्लक साठा जपून वापरण्याचे नियाेजन म्हणून अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद करण्याच्या निर्णयाची साेमवारी (दि. १८) प्रशासनाकडून अंमलबजावणी हाेण्याची शक्यता अाहे. पालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम अाढावा घेऊन पाणीकपातीच्या अाठवड्यातील वाराबाबत निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून कळते. बुधवारचा दिवस पाणी बंद ठेवण्यासाठी निश्चित हाेऊ शकताे, असेही सांगितले जाते.
मराठवाड्याला पाणी साेडल्याने गंगापूर धरण समूहातून पालिकेला मिळणाऱ्या अारक्षणात माेठी कपात झाली. ४६०० दशलक्ष घनफूट पाणी अपेक्षित असताना तेच पाणी हजार दशलक्ष घनफुटांपर्यंत अाले. त्यात सध्या प्रतिदिन प्रतिव्यक्ती याप्रमाणे सुरू असलेला पाणीपुरवठा कायम ठेवला तर मेच्या अखेरीसच पाणी संपण्याची भीती अाहे. सद्यस्थितीत १८९३ दशलक्ष घनफूट पाणीसाठा महापालिकेकडे असून, २०२ दिवसांचा विचार केला तर पालिकेला २४९४ दशलक्ष घनफूट पाणी अपेक्षित अाहे. अाठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले, तर प्रतिदिन १२. ३५ दशलक्ष घनफूट याप्रमाणे पुढील २९ दिवसांची बचत हाेऊन उर्वरित १७३ दिवसांसाठी २१३६ दशलक्ष घनफूट पाणी लागेल. त्यातही २०दिवसांचा पाणी तुटवडा असेल, मात्र अाठवड्यातून दाेन िदवस पाणी बंद ठेवले तर ५९ दिवसांची बचत हाेऊन उर्वरित १४४ दिवसांसाठी १७७८ दशलक्ष घनफूटच पाणी लागेल. यात २११ दिवस पाणी पुरणार असून, दिवस अतिरिक्त म्हणजेच सप्टेंबरपर्यंत पाणी पुरेल असे प्रशासनाचे म्हणणे अाहे. या दाेनपैकी एक म्हणून अाठवड्यातून ‘एक दिवस पाणी बंद’चा प्रस्ताव महासभेने मंजूर केला त्याची अंमलबजावणी प्रशासनाच्या काेर्टात असून साेमवारी अायुक्त निर्णय घेतील, असे सांगितले जाते.
३१ जुलैपर्यंतच्या पाण्याचे नियाेजन
या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या दुसऱ्या अाठवड्यात अाढावा घेतला असता प्रतिदिन ३५० दशलक्ष लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा सुरू राहिला तर ४९ दिवसांचे पाणी कमी पडणार हाेते. त्यानंतर महापालिकेने ११ जानेवारीला पुन्हा अाढावा घेऊन अागामी २०२ दिवस, म्हणजेच ३१ जुलैपर्यंत किती पाणी लागेल, याचे नियाेजन केले.