आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्वी शिक्षकासाठी विद्यार्थ्यांनीच केला संप, आता आदरयुक्त भीतीही वाटेना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विद्यार्थी शिक्षक यांच्यामधील नात्यामध्ये पूर्वी वेगळेच आदराचे ऋणानुबंध होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी ओळख असलेल्या शिक्षकांविषयी आयुष्यभर आदर वाटायचा. विद्यार्थीप्रिय शिक्षकांची बदल झाल्याने एका शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क २९ दिवसांचा संप केला होता. विद्यार्थ्यांच्या मागणीपुढे अखेर संस्थाचालकांना नमावे लागले अाणि त्या शिक्षकांची बदल रद्द करावी लागली. काही वर्षांत सामाजिक परिस्थितीत अनेक स्थित्यंतरे झाल्याने विद्यार्थी पालकांच्या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. शिक्षा करण्याचा अधिकार हिरावून घेतल्याने शिक्षकांना विद्यार्थी घडवताना अनेक मर्यादा येऊ लागल्या आहे.
एका विद्यार्थ्याला शिक्षकांनी रागावल्यानंतर त्या विद्यार्थ्याने उलट उत्तर देत सर्वांसमोर शिक्षकांचा अपमान केला. पालकांनीही त्या मुलाचीच बाजू घेतली. शिक्षकांप्रति आदरयुक्त भीती असायला हवी, पालकांनीही आपल्या पाल्याला चांगले आणि वाईट हे समजून सांगत योग्य दिशा दिली तरच पुन्हा विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून शिक्षकांची ओळख निर्माण होऊ शकेल.
शिक्षकांना सध्याच्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करत असताना अनेक मर्यादा लादल्याने शिक्षकांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहे. गुणवत्तावाढी प्रयत्न करणाऱ्या तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शिक्षकांना अनेकदा विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी कठोर भूमिका घ्यावी लागते. शिक्षकांनी घेतलेल्या अशा भूमिकांना पालकही साथ द्यायचे. परंतु, आता मात्र, पालकांचीच भूमिका बदलली असून, तेही आपल्या पाल्याचीच री ओढताना दिसतात. योग्य वयात शिस्त लागल्याने अनेक विद्यार्थी पुढे चुकीच्या मार्गावर गेल्याची अनेक उदाहरणे शिक्षकांकडून दिली जातात.
बातम्या आणखी आहेत...