आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक प्रश्न मांडा, 5 मिनिटे थांबा अन् सभा सोडून बिनधास्त जा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापालिकेच्या पूर्व विभागाची मासिक सभा साेमवारी सुरू झाली तेव्हा १५ नगरसेवक हजर हाेते. काही वेळाने ही संख्या दहावर अाली. - Divya Marathi
महापालिकेच्या पूर्व विभागाची मासिक सभा साेमवारी सुरू झाली तेव्हा १५ नगरसेवक हजर हाेते. काही वेळाने ही संख्या दहावर अाली.
नाशिक- साडे अकरा वाजेच्या सुमारास पूर्व विभागाची मासिक सभेची सुरुवात होते.. या सभेच्या सुरुवातीला उपमहापाैरांपासून तर तब्बल १० नगरसेवकांची हजेरी असते.. मात्र, सभेला दहा मिनिटे होताच उपमहापौरांपाठोपाठ एकामागे एक असे चक्क नगरसेवक सभा सोडून निघून जातात. ही परिस्थिती सोमवारी (दि.२१) महापालिकेच्या पूर्व विभागाच्या मासिक सभेत दिसून आली. अगदी पाच ते सहा मिनिटे आपले प्रश्न मांडून सभेत थांबता थेट बाहेर निघून जाणाऱ्या नगरसेवकांच्या विकासकामांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

पूर्व विभागाची सभा सोमवारी सभापती शाहीन मिर्झा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पूर्व विभागातील पाच प्रभागातील १९ नगरसेवकांमध्ये भाजपचे १२, राष्ट्रवादी ४, काँग्रेस आणि अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. मात्र, प्रभाग सभेत अनेक नगरसेवक गैरहजर असतात. सोमवारी झालेल्या सभेतही १९ पैकी केवळ १० नगरसेवकच हजर होते. यामध्ये उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेवक श्याम बडोदे, सतीश सोनवणे, चंद्रकांत खोडे, नगरसेविका आशा तडवी, सुषमा पगारे, अर्चना थोरात, सुमन भालेराव, रूपाली निकुळे, दीपाली कुलकर्णी, सुप्रिया खोडे उपस्थित होते. प्रभाग सभेच्या सुरुवातीलाच काही वेळ थांबून उपमहापौर प्रथमेश गिते हे निघून गेले. त्यानंतर नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी इंदिरानगर भागातील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत गणेशोसत्वकाळात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी केली. त्यानंतर खोडे थेट बाहेर निघून गेले. त्यानंतर नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांनी शहरात वृक्षांच्या फांद्या उचलण्यासाठी सुरू करण्यात आलेली स्वतंत्र घंटागाडी कधीच दिसली नाही, त्यांच्यामार्फत काय कामे केली जातात असा प्रश्न उपस्थित केला. 

नगरसेवक सतीश सोनवणे यांनी शहरात सध्या डेंग्यूची साथ सुरू असताना कर्मचाऱ्यांकडून याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला. यानंतर नगरसेविका अर्चना थोरात यांनी मोकाट श्वानांच्या विषयावर जाब विचारत प्रश्न संपताच सभागह सोडून िघून गेल्या. उपमहापौरांच्या मागे एकामागे एक अशा पाच नगरसेवक निघून गेल्याने प्रभाग सभा ४५ मिनिटांतच अाटोपण्यात आली. 

या नगरसेवकांची गैरहजेरी 
प्रभागसभेत कधीही कोरम पूर्ण राहत नसल्याने अधिकारीही सभेत उपस्थित राहत नसल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. सोमवारी झालेल्या सभेत ज्येष्ठ नगरसेवक तथा आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक राहुल दिवे, शोभा साबळे, समिना मेमन, मुशीर सय्यद, सुफीयान जीन, अनिल ताजनपुरे गैरहजर हाेते. 

गंभीर प्रश्न, तरी ४५ मिनिटांतच संपली सभा 
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जुने नाशिक, भारतनगर, वडाळारोड. उपनगरभागासह वडाळागावात आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत असताना या भागातील नगरसेवकांमध्ये कोणत्याही प्रकारचे गांभीर्य दिसून आले नाही. केवळ नगरसेवक अॅड. श्याम बडोदे, सतीश सोनवणे आणि नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी या सोडले तर कोणालाही अधिकाऱ्यांना व्यवस्थित प्रश्न विचारता आले नाही. विशेष म्हणजे, अनेकवेळा सभापतींनादेखील अधिकाऱ्यांना काय आदेशित करावे, काय नाही असा प्रश्न पडल्याचे दिसून आले. 
बातम्या आणखी आहेत...