आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकच्या विद्यार्थिनींचा विअरेबल बसपास राष्ट्रीय स्तरावर अव्वल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षणनोकरी निमित्त एसटीने प्रवास करताना वापरला जाणारा मासिक बसपास कंडक्टरकडून पंच करावा लागतो. रोजच्या गर्दीत कधी पास हरवतो, तर कधी फाटतो. बसपासच्या या कटकटींपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी नाशिकच्या वाय. डी. बिटको हायस्कूलमधील अर्पिता म्हाळणकर गायत्री बागुल या विद्यार्थिनींनी अनोख्या कल्पकतेतून साकारलेल्या "इझी ट्रॅव्हलर-विअरेबल बसपास' या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे राष्ट्रीय स्तरावर झालेल्या इनोव्हेशन फेस्टिव्हल २०१६ मध्ये मुलींच्या प्रकल्पांमधून बेस्ट प्रोजेक्ट म्हणून प्रथम क्रमांकाने त्यांची निवड झाली आहे.
इनोव्हेशन फेस्टिव्हल या प्रदर्शनात देशभरातील १३५ विद्यार्थ्यांच्या ७१ प्रकल्पांची निवड झाली होती. यात वाय. डी. बिटको गर्ल्स हायस्कूल ज्यु. कॉलेजमधील इयत्ता वीतील अर्पिता म्हाळणकर गायत्री बागुल यांच्या कल्पनेतील इझी ट्रॅव्हलर-विअरेबल बसपासची निवड झाली. शासनमान्य कन्या शाळेच्या एकूण १५ प्रकल्पांचा त्यात सहभाग होता. यात मुलींच्या गटात बेस्ट प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाची प्रथम क्रमांकाने निवड झाली. सन्मानचिन्ह चषक देऊन या विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. संस्थेतर्फेही त्यांचा गौरव करण्यात आला. त्यात संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वैशंपायन, उपाध्यक्ष प्रकाश वैशंपायन, रमेश महाशब्दे, प्रभाकर कुलकर्णी, मुख्याध्यापिका रेखा काळे, हेमंत बरकले, साहेबराव जाधव यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. वासंती पेठे, नेहा मुळे, सुरेखा कदम, रवींद्र कदम यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

आधुनिक तंत्रज्ञान, सुविधांचा अंतर्भाव
आरएफआयडीया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मनगटावर बांधता येईल असा बँड तयार करून इझी ट्रॅव्हलर-विअरेबल बसपास विकसित करण्यात आला आहे. रिचार्ज सिस्टिम, ऑनलाइन पेमेंटचा पर्याय, स्मार्ट मास ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम, रुट ट्रॅकिंग सिस्टिम, सिस्टेमॅटिक डाटाबेस सिस्टीम अशा अाधुनिक सुविधांचा अंतर्भाव यात आहे. हिरवा लाइट बसपास सुरू असल्याचा, तर पिवळा लाइट मुदत संपत आल्याचे दर्शवतो. लाल लाइट पासची मुदत संपल्याचा असल्याने वापरण्यास अतिशय चांगला बँड आहे. शाळेतील विज्ञान शिक्षक मेघना देशपांडे, अरुण महाजन, विष्णू घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे.