आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षाच्या तरूणाने साकारला कापडापासून श्रीगणेशा! इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी देतो प्रोत्साहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा व्‍हावा, यासाठी येथील एका 22 वर्षांच्‍या युवकाने कापडापासून गणेशमूर्ती तयार करून त्‍याची स्‍थापना केली. दरम्‍यान, मूर्तीची आकर्षकता आणि नावीन्‍य पाहून इतर अनेकांनी त्‍याच्‍याकडे अशा प्रकारच्‍या मूर्तीची मागणी झाली. त्‍यामुळे यातून त्‍याला पार्टटाइम व्‍यवसायसुद्धा मिळाला. चरण राव असे त्‍या कल्‍पक युवकाचे नाव आहे.
कशी सूचली कल्‍पना ?
चरण याला बाल्‍यावस्‍थेपासून मूर्ती, शिल्‍प, चित्र यांची आवड आहे. तो सिव्हिल इंजिनअर असून, एका ठिकाणी तो अर्धवेळ नोकरी करतो. आपल्‍या याच आवडीतून त्‍याने चार वर्षांपूर्वी कापडापासून गणपती तयार केला. परिसरातील नागरिकांनाही तो भावला. त्‍यामुळे आपल्‍यालाही असा गणपती तयार करून दे, अशी गळ त्‍यांनी घातली. तेव्‍हापासून चरण हा दरवर्षी कापडाचा गणपती तयार करतो. मागणी प्रमाणे आपण या मूर्तींची विक्री जरी करत असलो तरी आपला हा व्‍यवसाय नाही छंद असल्‍याचे त्‍याने divyamarathi.com ला सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा कापडाच्‍या गणपतीचे फोटोज...