आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीतात करिअरचा जुळवायचाय सूर, पण परिस्थितीची मिळेना ‘साथ’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - धुणी-भांडीकरणाऱ्या एरंडवाडीतील अाशा इप्पर यांचा अाशुताेष हा माेठा मुलगा. तल्लख बुद्धी असलेल्या अाशुताेषला साेयी-सुविधांअभावी अडचणींना सामाेरे जावे लागत अाहे. अवघ्या दहा बाय दहाच्या छाेट्याशा खाेलीत इप्पर कुटुंब राहते. अाशुताेषचे पितृछत्र लहानपणीच हरपले. त्यानंतर तळहाताच्या फाेडाप्रमाणे जपत अाईने त्याचा सांभाळ केला. त्यासाठी तिने काम वाढवले. इतके करूनही हजार ते दीड हजार रुपयेच महिन्याला तिच्या हाती पडतात. त्यात संसाराचा गाडा सांभाळताना अाशुताेष अाणि त्याच्या बहिणीच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागते. मुलांनाही या परिस्थितीची पुरती जाणीव अाहे. परिस्थितीचे भांडवल करता दाेघे मन लावून अभ्यास करतात. लासलगाव येथील महावीर विद्यालयात शिक्षण घेतलेल्या अाशुताेषला दहावीच्या परीक्षेत ६३ टक्के गुण मिळाले. ताे हार्माेनियम अाणि तबला अतिशय उत्कृष्ट वाजवताे. हा छंद जाेपासण्यासाठी ताे अवेकनिंग जागृतीच्या बालांगण संस्थेत नित्यनेमाने येताे अाणि तासन‌्तास सराव करताे. हळदीच्या कार्यक्रमात ताे ढाेलकी वाजवताे, तर कधी शाळेच्या ढाेलपथकातील महत्त्वाचा घटक असताे. बालांगणनेच अापल्या शिक्षणाची गाडी दहावीपर्यंत अाणल्याचे सांगत ही संस्था म्हणजेच अापले अायुष्य असल्याचे ताे सांगताे. यापुढील शिक्षणाची अाता त्याला चिंता भेडसावत अाहे. पैशांअभावी शिक्षण बंद हाेते की काय अशी भीती त्याला वाटत अाहे.
मुलांना शिकवून परिस्थिती बदलायचीय
^मी माझ्यापरीने मुलांच्या शिक्षणासाठी पूर्णत: प्रयत्न करीत अाहे. माझे शिक्षण झालेले नसल्यामुळे धुणी-भांडी करण्याशिवाय पर्याय नाही. पण, मुलांना शिकवून त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढायचे अाहे. - अाशा इप्पर, अाशुताेषची अाई

मदतीसाठी संपर्क साधा
समाजात असेही काही विद्यार्थी अाहेत की, ज्यांनी अतिशय बिकट परिस्थितीत दहावीत यश संपादित केलंय. हे यश घवघवीत वगैरे असेलच असे नाही. पण, त्यातून शिकण्याची त्यांची जिद्द मात्र अधाेरेखित हाेते. अशा बिकट परिस्थितीत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यशाेगाथा ‘दिव्य मराठी’ प्रसिद्ध करीत अाहे. अाशुताेष इप्परला शैक्षणिक साहित्य वा अार्थिक स्वरूपाची मदत मिळाल्यास त्याचा शिक्षणाचा प्रवास अव्याहतपणे सुरू राहील. त्याच्यासाठी अार्थिक मदत बंॅक अाॅफ महाराष्ट्रच्या लासलगाव शाखेत ६०१३८०१३९६० या अकाऊंट नंबरवर जमा करावी किंवा ७७९८१२३२४९ या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधावा.
संगीत त्याचा जीव की प्राण... संगीताचा शिक्षक वा संगीतकार हाेण्याची त्याची मनाेमन इच्छा... त्यासाठी अथक मेहनत करायचीही त्याची तयारी अाहे.. पण दुर्दैवाने परिस्थितीची त्याला ‘साथ’ नाही. गरिबीमुळे महाविद्यालयीन शिक्षण घेण्याच्या मनीषेवर पाणी फिरण्याची वेळ अाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...