आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education Committee New Members Appointment Today In Nashik

शिक्षण समिती सदस्यांची अाज नियुक्ती, १६ सदस्यांची नियुक्ती, नव्या अादेशामुळे संभ्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पालिका शिक्षण मंडळ बरखास्तीनंतर गठित हाेणाऱ्या शिक्षण समितीवरील नियुक्तीसाठी साेमवारी (दि.२७) सकाळी ११.३० वाजता विशेष महासभा होणार आहे. या समितीवर केवळ नगरसेवकांचीच नियुक्ती हाेणार असल्याने अशासकीय सदस्यांमध्ये नाराजी अाहे. दरम्यान, शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या नव्या अादेशामुळे समितीच्या नियुक्तीबाबतच साशंकता निर्माण झाली अाहे.

स्थायी प्रभाग समिती सभापती निवडणुकीनंतर लक्ष शिक्षण मंडळाकडे लागले अाहे. २०१२ मध्ये शिक्षण मंडळच बरखास्तीच्या शासकीय निर्णयानंतर त्याविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली हाेती. बालकांच्या माेफत शिक्षण हक्कासाठी तसेच पालिका शाळांचा दर्जा टिकण्यासाठी स्वतंत्र शिक्षण समिती करण्याचे अादेश न्यायालयाने दिले हाेते. त्यानुसार राज्यातील पालिका शाळांसाठी समिती गठित करण्याचा निर्णय होऊन तसे अादेशही पालिकेला दिले. या समितीवर नियुक्त होणारे एकूण साेळा सदस्य सभापती उपसभापतींची निवड करतील.

काेकणे यांचा अाक्षेप

शिक्षण मंडळाचे माजी सदस्य नीलेश काेकणे यांनी या निवड प्रक्रियेवर अाक्षेप घेतला अाहे. पालिकेतर्फे ३१ (अ) प्रमाणे होणारी निवड बेकायदेशीर असून, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारी असल्याचा दावा केला अाहे. अध्यादेश हा विधानसभा विधानपरिषदेत पारित झालेला नाही. त्यामुळे त्याचे कायद्यात रूपांतर झालेले नाही. अध्यादेशाची मुदत सहा महिन्याचीच अाहे. या अध्यादेशाचा कालावधी उलटून गेला अाहे. त्यामुळे ही निवड बेकायदेशीर असल्याचा दावाही त्यांनी केला अाहे.

शालेय शिक्षण, क्रीडा विभागाचा आदेश असा..

या अादेशात जुनीच मंडळे अस्तित्वात असल्याचे म्हटले अाहे. जाेपर्यंत पूर्वी गठित मंडळांची मुदत संपत नाही, ताेपर्यंत निवडणूक घेता येणार नसल्याचे निष्कर्ष न्यायालयाने नाेंदविले अाहेत. त्याअाधारे शिक्षण विभागाने अध्यादेश जारी केला अाहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीबाबत साशंकता निर्माण झाली असून, साेमवारी महापाैर काय भूमिका घेतात, हे बघणे अाैत्सुक्याचे ठरणार अाहे.