आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वंचितांना शिक्षणाचा 'नाशिक पॅटर्न'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- झोपडपट्ट्यांमधील अथवा रस्त्यावर भीक मागणारी मुले शाळेत जातात की नाहीत, शाळेत जात नसतील तर ते का जात नाहीत, असा प्रश्न कोणाला पडत नाही. परंतु, असा प्रश्न नाशिककरांनी या मुलांना विचारला आणि सुमारे सव्वासातशेहून अधिक मुले ही शिक्षणापासून वंचित असल्याचे पुढे आले. प्रसिद्ध विचारवंत संदीप वासलेकर यांच्या उपस्थितीत शनिवारी समारंभपूर्वक या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला. यातून वंचितांना शिक्षण उपलब्ध करून देण्याचा नाशिक पॅटर्न पुढे अाला असून, साेशल मीडियावरून झपाट्याने त्याचा प्रसार हाेत अाहे.
अशा या सकारात्मक कामासाठी नाशिकमध्ये गत दोन महिन्यांपासून ‘चांक शिक्षणाची’ या संस्थेने राबविलेल्या उपक्रमात नाशिककरांनी पुढाकार घेतला. हा पॅटर्न राज्यातील प्रत्येक शहरात आणि गावात राबविला तर एकही बालक शिक्षणापासून वंचित राहाणार नाही. एकप्रकारे हा पॅटर्न राज्याला दिशादर्शक ठरणार आहे.
आर्थिक परिस्थिती, पालकांचे अज्ञान आणि परिसरातील वातावरण यामुळे अनेक विद्यार्थी हे शाळाबाह्य आहेत. यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे, परंतु त्याचा उपयोग नसल्याचे समोर येत आहे. येत्या जुलै रोजी संपूर्ण राज्यात शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करणार आहे. यामध्ये प्रत्येक शहर आणि गावातील तरुणांनी आणि नागरिकांनी सहभाग घेऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना आणि त्यांच्या पालकांच्या अडचणी जाणून तसेच शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तर एकही मुलगा शाळाबाह्य राहाणार नाही.
नाशिक शहरात नुकतेच १२७ झोपडपट्ट्या, शहरातील सिग्नल, रामकुंड, रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि उड्डाणपुलाखालील मुलांचा शोध घेऊन ७१० मुलांना पालिकेच्या शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. ‘चाकं शिक्षणाची’ ही संस्था केवळ प्रवेश देऊन थांबली नाही तर मुलांना त्यांच्या घराजवळच्या शाळेत प्रवेश, दूरवरच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना बस उपलब्ध करून दिली आहे. वर्षभर या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेची आवड याविषयी निरीक्षण करणार आहे.
उपक्रमात नाशिककरांचा सहभाग
-‘एव्हरी चाइल्ड काउंट्स सिटिझन कॅम्पेन’ या उपक्रमात केवळ संस्थाच नाही तर सर्व नाशिककरांनी सहभाग घेतला होता. त्यामुळे शहरातील सुमारे ७०० बालकं शिक्षण घेऊ शकतील. जर प्रत्येक शहरात आणि गावात एखाद्या सामाजिक संस्थेने हा उपक्रम राबविला आणि त्यांना नागरिकांनी साथ दिली तर एकही बालक हे शिक्षणापासून वंचित राहाणार नाही.
सचिन जोशी, अध्यक्ष, चाकं शिक्षणाची
बातम्या आणखी आहेत...