आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल भारतवाणीतून आता सर्व भाषांत शिक्षण, विद्यापीठ अनुदान आयोगाचा नवा प्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशातील सगळ्या भाषांत शिक्षण तसेच जगात कुठेही असताना सर्वसमावेशक शिक्षणपद्धती अवलंबिण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना अभ्यासक्रम अभ्यास साहित्य सर्व भाषांत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. या अनोख्या प्रकल्पाला ‘भारतवाणी’ असे नाव दिले जाणार असून, यामध्ये व्हिडिओ, ऑडिओ आणि अन्य डिजिटल माध्यमांतून शिक्षण मिळणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया प्रकल्पात शिक्षण संस्थांचा सहभागमोलाचा आहे. नव्या पोर्टलद्वारे शिक्षण संस्था, पाठ्यपुस्तक प्रकाशक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे, राज्य शिक्षण मंडळांकडून शैक्षणिक साहित्य मागविले जाणार आहे. देशात तब्बल १२२ मूळ भाषा आणि २३४ बोलीभाषा आहेत. या भाषांचा समन्वय साधत, एकाच वेबसाइटवर सगळ्या भाषांतून विविध विषयांचे ज्ञान उपलब्ध करून देण्याचा उद्देश या प्रकल्पामागे आहे. देशातील भाषांमधील दरी कमी करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार आहे.

असा आहे प्रकल्प
जगातीलसगळ्यात मोठे लँग्वेज पोर्टल. महत्त्वाचे लेखक, डिजिटल कंटेंट रायटर, विविध प्रकाशन संस्थांचा सहभाग. खुल्या शिक्षण प्रणालीत महत्त्वाची भूमिका. दूरशिक्षण घेणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. डिजिटल इंडियात प्रकल्पाचा समावेश. युजीसीकडून २४ नोव्हेंबरच्या परिपत्रात संस्था आणि लेखकांची माहिती देण्याचे आवाहन.
बातम्या आणखी आहेत...