आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Education News Un Marathi, Scholorship Isusr At Nashik, Divya Marathi

शिष्यवृत्तीसाठी आता एकदाच करा नोंदणी, 25 हजार विद्यार्थी लाभापासून वंचित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाविद्यालयीन शिक्षणासाठी सामाजिक न्याय विभागाकडून दिल्या जाणा-या शिष्यवृत्तीसाठी आता एकदाच नोंदणी करावी लागणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून (2015-16) हा उपक्रम सुरू होणार आहे.
विभागातर्फे इतर मागासवर्ग, अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि फ्रीशिप दिली जाते. विद्यार्थ्यांना दरवर्षी यासाठी नोंदणी करावी लागत होती. जिल्ह्यातील 550 महाविद्यालयांतील सुमारे दीड लाख विद्यार्थी वर्षाकाठी शिष्यवृत्ती व फ्रीशिपचा लाभ घेतात. मात्र, काही विद्यार्थ्यांना दरवर्षी सलग शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास अडचणी येत असल्याने ते वंचित राहतात. यापुढे कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर एकदाच शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करावी लागणार आहे.
25 हजार विद्यार्थी वंचित : जिल्ह्यात यावर्षी एक लाख 100 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपसाठी नोंदणी केलेली आहे. मात्र, त्यापैकी सुमारे 25 हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रीशिपपासून वंचित आहेत.