आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"शिक्षणहक्क'च्या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षण हक्ककायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये (२५ टक्के) आरक्षित जागांच्या प्रवेशाकरिता शिक्षण विभागाच्या वतीने विहित मुदतीत पुन्हा एकदा एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २६) अॉनलाइन अर्ज करण्याची शेवटची संधी आहे. शिक्षणहक्क प्रवेशासाठी आतापर्यंत पाच हजार १६७ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यातील ३४४३ विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले आहेत.
नाशिकमध्ये यंदा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत असला तरी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सर्व्हर डाउनमुळे अनेक अडथळे निर्माण झाले. विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणी करण्यात अडचणी आल्याने तीन वेळा मुदत वाढवण्यात अाली. शैक्षणिक वर्ष २०१६ २०१७ यासाठी पूर्व प्राथमिक (नर्सरी) प्राथमिक (पहिली) इयत्तेतील प्रवेशासाठी जिल्हाभरातील ५९०० जागांसाठी आतापर्यंत हजार १६७ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

२५ एप्रिलपर्यंत प्रवेश अर्जाची नोंदणी करण्याची शेवटची मुदत होती. मात्र, अखेरच्या दोन दिवसांमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड झाल्याने पालकांना अर्ज करता आले नाही. विद्यार्थी पालकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन शिक्षण विभागाने पुन्हा एक दिवस मुदतवाढ केली आहे. त्यानुसार दि. २६ एप्रिलला www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पालकांना आपल्या पाल्यांचे अर्ज करता येणार आहेत.
गैरसाेय टळण्यासाठी पुन्हा एकदा संधी
^शिक्षणहक्क प्रवेशांसाठी ऑनलाइन अर्ज करताना अनेक वेळा तांत्रिक अडथळे आले. सर्व्हर अनेकदा डाउन झाला. परंतु, पालकांची गैरसोय होऊ नये यासाठी वारंवार मुदत वाढविण्यात आली. प्रवेशासाठी अर्ज करण्याची मंगळवारी शेवटची मुदत अाहे. उमेश डोंगरे, प्रशासनाधिकारी,महापालिका शिक्षण विभाग