आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"शिक्षणहक्क'साठी सर्व शाळांना एकच वयोमर्यादा, काही शाळांच्या मनमानीला शिक्षण विभागाचा लगाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शिक्षण विभागाने निर्धारित केलेल्या किमान वयोमर्यादेस पात्र असतानाही काही शाळा किमान वयाच्या अटींचे सोयीस्कर निकष लावून प्रवेश नाकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने शाळांच्या मनमानीला लगाम लावत पाच वर्षांवरील प्रत्येक बालकास प्रवेश देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे किमान वयाच्या अटींची पूर्तता होऊ शकल्याने अपात्र राहिलेल्या (अर्ज दाखल झालेल्या) पालकांना आता पुन्हा अॉनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे पाच वर्षांवरील ते सहा वर्ष ११ महिने २९ दिवस या वयोमर्यादेत असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांस शिक्षणहक्क कायद्यांतर्गत राखीव २५ टक्के जागांवर प्रवेश मिळू शकणार आहे.
शिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष २०१६ २०१७ साठी शाळा प्रवेशाकरिता बालकांचे किमान वय निर्धारित केले अाहे. मात्र, शहरातील अनेक शाळांनी प्रवेशासाठी वेगवेगळ्या वयोमर्यादा जाहीर केल्याने अपात्र विद्यार्थ्यांची संख्या वाढली. विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या. पालकांना पाल्याचे ऑनलाइन अर्ज भरताना शाळांकडून वेगवेगळी वयोमर्यादा दाखविण्यात येत असल्याने अनेकांना प्रवेश मिळवण्यात अडथळे आले. किमान वयाच्या अटींबाबतचे सोयीस्कर निकष लावून प्रवेश नाकारले जात असल्याने अनेकांचे अर्जच दाखल होऊ शकले नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने सर्व शाळांना पत्र पाठवून किमान वयोमर्यादेच्या अटी एकच ठेवण्याचे अादेश दिले आहेत. ऑनलाइन अर्ज सबमिट झाल्याने विद्यार्थ्यांना ‘अपात्र’ दाखविण्यात आले. अाता शिक्षण विभागाच्या स्पष्टीकरणामुळे कथित अपात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची पुन्हा संधी प्राप्त झाली असून त्यासाठी विहित मुदतीतही वाढ करण्यात आली.

सर्वशाळांसाठी एकच वयोमर्यादा : शिक्षणविभागातर्फे शिक्षणहक्क प्रवेशासाठी यंदा शहरात पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत आहे. www.rte25admission.maharashtra.gov.in वर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. शाळांमध्ये पूर्व प्राथमिक (नर्सरी) आणि प्राथमिक (पहिली) या वर्गांसाठी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू असून वयोमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. त्यानुसार आता इयत्ता पहिलीसाठी ते वर्ष ११ महिने २९ दिवस या वयोमर्यादेतील प्रत्येकाला प्रवेश मिळणार आहे.