आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिक्षणहक्क’च्या हजार जागांसाठी फेब्रुवारीत प्रवेशप्रक्रिया, शिक्षण विभागाची अधिसूचना जाहीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०१७ २०१८ या वर्षाकरिता शिक्षणहक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये (२५ टक्के) राखीव जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेशप्रक्रियेविषयी शिक्षण विभागाकडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही शिक्षणहक्कची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत असून ते २१ फेब्रुवारीपर्यंत पालकांना ऑनलाइन प्रवेश अर्ज करता येतील. प्रवेश अर्जांनंतर पहिली सोडत जाहीर केली जाणार असून त्यानंतर प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर दुसरी तिसरी सोडत जाहीर होऊन प्रवेशप्रक्रिया होईल. 

बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २०१७ २०१८ या वर्षासाठी २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होत आहे. शहर िजल्ह्यातील स्वयंअर्थसहाय्यित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित (अल्पसंख्याकशाळा वगळून) पात्र शाळांची यादी तयार केली जात आहे. शाळांना फेब्रुवारीपर्यंत शिक्षण विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे. पूर्व प्राथमिक (नर्सरी) प्राथमिक (पहिली) इयत्तेसाठी प्रवेशासाठी जिल्हाभरातील ३७४ शाळांमध्ये तब्बल ५९०० जागा आहेत. नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याने या वर्षीसाठी या जागांमध्ये वाढ होईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली. शिक्षण हक्क प्रवेशाबाबत www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

२११६ एकूण प्रवेशाच्या जागा 

नाशिक जिल्ह्यातील प्रवेशाच्या जागा 
जिल्ह्यातील शाळांची संख्या : ३७४ 
प्रवेशाच्या एकूण जागा : ५९०० 

..अशी होईल प्रवेशप्रक्रिया 
१६ जानेवारी ते ३ फेब्रुवारी : शाळांचीनोंदणी करणे 
५ ते २१ फेब्रुवारी : पालकांनीऑनलाइन अर्ज भरणे 
२७ ते २८ फेब्रुवारी : पहिलीसोडत होणार जाहीर 
१ ते ९ मार्च : यादीतील विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेणे 
(पहिली सोडतीतील प्रवेशप्रक्रिया पार पडल्यानंतर दुसरी तिसरी सोडत जाहीर होईल.) 

शहर जिल्ह्यातील प्रवेशाच्या जागा 
९८ नाशिक शहरातील शाळांची संख्या 
९८ नर्सरी प्रवेशाच्या जागा 
१७२९ पहिलीच्या प्रवेशाच्या जागा