आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणहक्क प्रवेश प्रक्रिया सोडत 3 मे, ३५३० अर्ज निश्चित; शहरात अाले सर्वाधिक अर्ज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आर्थिक दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणहक्क कायद्यांतर्गत सुरू असलेल्या २५ टक्के प्रवेशाची पहिली सोडत मे रोजी जाहीर होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली. सोडत जाहीर झाल्यानंतर अर्ज निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर होणार आहे. जिल्ह्यातील ५९०० जागांसाठी ५५८५ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून, त्यातील २०५५ विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले असून ३५३० विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले आहेत.
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत दुर्बल घटकांतील गरजू विद्यार्थ्यांना शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे. शैक्षणिक वर्ष २०१६ २०१७ यासाठी पूर्व प्राथमिक (नर्सरी) प्राथमिक (पहिली) इयत्तेच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. नाशिकमध्ये यंदा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येत असल्याने ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत अनेकदा अडथळे निर्माण झाले. संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तीन-चार वेळा विहित मुदतीत वाढ करण्यात आली. अखेर प्रवेश अर्ज करण्याची विहित मुदत संपुष्टात आली असून, ३५३० विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले आहेत. मे रोजी दुपारी वाजता शासकीय कन्या विद्यालयात सोडत जाहीर होणार आहे. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयंअर्थसाहाय्य तत्त्वावर असलेल्या (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये २५ टक्के जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे.
www.rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशासंबंधीची सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
५५८५ : विद्यार्थ्यांचेआलेले अर्ज
३५३०: विद्यार्थ्यांचेअर्ज निश्चिती पूर्ण
२०५५: अपात्रठरलेले अर्ज
नाशिक जिल्हा
३७४ एकूणशाळा
५९००एकूणजागा
२०५५ विद्यार्थी ठरले अपात्र