आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील शैक्षणिक संकुलांचेही पार्किंगकडे दुर्लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शैक्षणिकसंकुलांच्या बाबतीत प्रत्येक १५० चाैरस मीटर बांधकामासाठी एक चारचाकी चार दुचाकींसाठी पार्किंग गरजेची असल्याचा नगररचना विभागाचा नियम असताना, प्रत्यक्षात शहरातील बहुतांश शैक्षणिक संकुलांमध्ये पार्किंगची व्यवस्थाच करण्यात अालेली नसल्याचे दिसते. परिणामी शाळा, महाविद्यालये भरण्याच्या अाणि सुटण्याच्या वेळी पालक, विद्यार्थी रस्त्यावरच वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रचंड खाेळंबा हाेताे.
काॅलेजराेडवर ही समस्या प्रकर्षाने जाणवते. किलबिल, डाॅन बाॅस्काे या शाळांना पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने या रस्त्यावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे हाेते. बीवायके महाविद्यालयात पार्किंगची व्यवस्था असली तरीही विद्यार्थीवर्ग पेट्राेलपंपाच्या बाजूने रस्त्यावरच माेठ्या प्रमाणात वाहने पार्क करताे. महाविद्यालयाच्या बाहेरही पार्किंग असल्यामुळे महाविद्यालय व्यवस्थापनही त्यात लक्ष घालत नाही. त्यामुळे सर्वसामान्य वाहनचालकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना माेठी कसरत करावी लागते.
पार्किंगअभावी पालक शाळेबाहेर रस्त्यावरच वाहने उभी करीत असल्याने इतर वाहने येथून जाण्यासाठी असा रस्ताच शिल्लक राहत नाही.

किलबिल शाळेच्या बाहेर पालकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने अशी वाहतूक काेंडी येथे नित्याचीच झाली आहे.