आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंडी; शेकड्यामागे 80 रुपयांची झाली घसरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - धार्मिक महत्व असलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील उपवास भाजीपाल्याचे दरही स्थिरावल्याने अंड्यांची मागणी घटली आहे. यामुळे अंड्यांच्या दरात शेकड्यामागे ७० ते ८० रुपयांची घसरण झाली असून अाता दर प्रतिशेकडा ४९० रुपयांपर्यंत पोहोचल्याचे विक्रेत्यंानी सांगितले. 

 

तपमानाचा पारा घसरत असताना दुसरीकडे भाजीपाल्याचे दरही कडाडल्याने अंड्यांच्या मागणीत वाढ झाली होती. याच कारणांमुळे अंड्यांच्या किंमतीत यंदा विक्रमी वाढ झाली होती. त्यामुळे शहरात गेल्या आठवड्यात अंड्यांचा दर ५८० रुपये शेकडापर्यंत पाेहोचला हाेता. तसेच, किरकाेळ बाजारातही अंड्यांचा दर प्रतिनग अाठ रुपयांपर्यंत गेला हाेता. मात्र, मार्गशीर्ष महिन्यात असणारे उपवास तसेच भाजीपाल्याचे दरही स्थिरावल्याने अंड्यांची मागणी अाता घटली आहे. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी घटल्याने अंड्यांच्या दरात तब्बल ७० ते ८० रुपयांची घसरण झाली आहे. सद्यस्थितीत किरकोळ बाजारात पाच ते सहा रुपयांपर्यत दर खाली अाले आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास या दरात आणखी घट होण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली अाहे. 


मागणी घटल्याने भावात घसरण 
मार्गशीर्ष महिना अाणि भाज्यांचे दर खाली अाल्याने काही दिवसांपासून मागणी घटल्याने अंड्यांच्या दरात ८० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. दरामध्ये आणखी घसरण होऊ शकते. - पवन तांबोळी, अंडी विक्रेते 

बातम्या आणखी आहेत...