आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगल मैत्रीतून आठ जाेडपी संसारवाटेवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भावना आहेत, जगण्यातील आनंद घेण्याची ऊर्मी आहे; परंतु समाज त्यांना स्वीकारण्याच्या सीमारेषेवर आहे. अंधाऱ्या खाेलीतील काेपऱ्यातच त्यांनी उरलेसुरले आयुष्य एकट्याने कुंठावे ही विचारधारा अजूनही संपायला तयार नाही. परंतु महिंद्रा अँड महिंद्रा यश फाउंडेशनने अशा एकाकी एचआयव्ही बाधितांना जीवनसाथी शाेधून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
मंगलमैत्री उपक्रमांतर्गत रवविारी नाशिकमध्ये एचआयव्हीबाधितांचा मंगल मैत्री मेळावा घेण्यात आला. त्यात राज्यातील ९१ उपवर आणि ४८ महिलांनी वविाहासाठी इच्छा दर्शवली. यातील आठ जाेडपी लग्नाच्या गाठी बांधण्याच्या मार्गावर आली आहेत. एचआयव्हीची लागण शारीरिक असली तरी संबंधित व्यक्तीच्या शरीराच्याही आधी त्याचा मनावर परिणाम होतो. आयुष्य उदध्वस्त करणारा "एड्स' माणसाच्या भाववशि्वाला सुरुंग लावतो. लहान वयात किंवा लग्नाआधी झालेली ‘एड्स'ची लागण अनेकांचं सहजीवनाचं स्वप्नच धुळीला मिळवते. पण हे स्वप्न साकार करण्याची संधी देणारा हा मेळावा गेल्या पाच वर्षांपासून आयोजित केला जात आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा यश फाउंडेशन, नेटवर्क आॅफ पाॅझिटवि्ह पीपल अँड चिल्ड्रन लवि्हिंग, मालेगाव येथील विहान प्रकल्प आणि जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक पथक यांच्या संयुक्त विद्यमाने हा मंगल मैत्री मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महिंद्रा अँड महिंद्राचे महाव्यवस्थापक नसीर देशमुख होते. जिल्हा ग्रामोद्याेग अधिकारी रमेश सुरुंग, जिल्हा प्रकल्प अधिकारी याेगेश परदेशी, एनपीसीच्या अध्यक्षा संगीता पवार व यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते. असे मेळावे झाले तर समाजाच्या मुख्य प्रवाहात एचआयव्हीबाधितांना जगण्याचा आनंद मिळेल, असा सूर प्रमुख पाहुण्यांच्या भाषणातून व्यक्त झाला.
बालकांसाठी मेळा
एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, मार्गदर्शन, शासकीय याेजनांबाबतची माहिती, वधूवर परिचय मेळावा, लग्नापूर्वी व लग्नानंतरचे समुपदेशन, मुलांसाठी शैक्षणिक वसतिगृहाचा पाठपुरावा, बालकांचा आनंद मेळा आदी कार्यक्रमांचेदेखील मेळाव्यानिमित्त आयाेजन करण्यात आले होते.
आतापर्यंत १३ लग्ने झाली
^
मंगल मैत्री म्हणजे एचआयव्हीबाधितांसाठी नवीन आयुष्याची सुरुवात करण्याची संधीच. आपल्याप्रमाणेच अनेकांना जोडीदाराची गरज असल्याची जाणीव या मेळाव्यामधून होते. गेल्या पाच वर्षांमध्ये या मेळाव्याच्या माध्यमातून १३ लग्ने झाली. यंदा सर्वाधिक प्रतिसाद होता.
रवींद्र पाटील, अध्यक्ष, यश फाउंडेशन