आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाठ महिन्यांत हजार रुग्णांना जीवदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- राष्ट्रीयग्रामीण अाराेग्य अभियानांतर्गत राज्य शासनाच्या महाराष्ट्र अापत्कालीन वैद्यकीय सेवा यांच्या वतीने अाणि भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेल्या १०८ क्रमांकाच्या अॅम्ब्युलन्स सेवेद्वारे अाठ महिन्यांत राज्याच्या विविध भागात एक हजारपेक्षा जास्त रुग्णांना जीवदान मिळाले अाहे. इतकेच नव्हे, तर रुग्णवाहिकेत तीन हजार गराेदर मातांनी बाळांना जन्म दिला अाहे. १६ राज्यांत सुरू असलेल्या या सेवेत महाराष्ट्रातच रुग्णवाहिकेसाेबत डाॅक्टरही उपस्थित असतात.
रस्त्यावर कुठेही अपघात घडल्यास ‘१०८’ या दूरध्वनी क्रमांकावर काॅल केल्यानंतर जास्तीत जास्त २० मिनिटांत घटनास्थळी पाेहोचणारी जीवनदायी सेवा म्हणून या उपक्रमाकडे बघितले जात अाहे. सिंहस्थ पर्वणीकाळात नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पूर्ण ताकदीने तीन महिने सेवा देण्यासाठी भारत विकास ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी दाैरा केला अाहे. ज्या ठिकाणी रुग्णवाहिका जाऊ शकत नाही अशा ठिकाणांवर स्ट्रेचरसह विशेष पथक तैनात राहणार असून, तत्परतेने हे पथक रुग्णवाहिकेपर्यंत रुग्णांना पाेहोचवेल.

सुखद सोमवार
तर पाेलिस कारवाई
यासेवेसाठी फेक काॅल करणाऱ्यांवर पाेलिसांत कारवाईही केली जाऊ शकते. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून फेक काॅल करू नये, असे अावाहन उत्तर महाराष्ट्र प्रमुख डाॅ. नीलेश चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केले.

अशी मिळते सेवा
रुग्णवाहिकासेवेचे मुख्यालय पुणे येथे अाहे. ‘१०८’ क्रमांकावर काॅल केल्यास ताे इमर्जन्सी रिस्पाॅन सेंटर येथे जाताे. तेथे तीन रिंग वाजल्यानंतर काॅल रिसीव्ह केला जाताे. त्यानंतर पत्ता नाव विचारले जाते. ज्या ठिकाणी घटना घडली त्या परिसरात असलेल्या रुग्णवाहिकेला काॅल जाेडला जाताे. तेथून जास्तीत जास्त २० मिनिटांत रुग्णवाहिका पाेहोचते.