आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शहरात आठ हजार घरे परवानगीविना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकीकडेनाशिक शहरात अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यासाठी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मोहीम उघडली असतानाच दुसरीकडे शहरात जवळपास आठ हजार ६९८ घरांची बांधकामे परवानगीअभावी अनधिकृत ठरल्याची बाब समोर आली आहे. या बांधकामांना परवानगी दिली, तर जवळपास १०० कोटींचा महसूल पालिकेला प्राप्त होईल, असा अंदाज व्यक्त केला जात असून, यात शहरातील अनेक माेठ्या इमारतींचाही समावेश असल्याचे सांगितले जाते.
सन २००५-०६ पासून नगररचना विभागात इमारतींना पूर्णत्वाचा दाखला देण्याची प्रकरणे पडून राहण्यास सुरुवात झाली. या िवभागात जवळपास नऊ वर्षांत आठ हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. या कालावधीत २७ हजार ३४३ इमारत पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठीची प्रकरणे आली. त्यातील १८ हजार ६९५ इमारतींच्या प्रकरणांना मंजुरी मिळाली. यातील अनेक इमारतींचा वाणिज्य वापर सुरू असून, पूर्णत्वाच्या दाखल्यापाेटी मिळणारी रक्कम तर साेडा, मात्र घरपट्टीही या इमारतींना लागू झालेली नाही. त्यामुळे महापालिकेला माेठा महसूल मिळण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग मानला जात आहे.

अडचणींचाफेरा, विकास आराखड्याची भीती : महापालिकेच्यानगररचना विभागात इमारतीच्या पूर्णत्वाच्या दाखल्याच्या मंजुरीसाठी प्रकरण आल्यानंतर या प्रक्रियेत निर्माण हाेणा-या अडचणीही हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे. याव्यतिरिक्त नगररचना विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन विकास आराखडा निर्मितीचे काम सुरू असल्यामुळे अनेक विकसकांनी पूर्णत्वाच्या दाखल्यांसाठी अर्ज केलेले नाही. याबराेबरच माेठ्या प्रकल्पांचा विचार केला तर २० हजार चाैरस मीटरपुढील बांधकामांच्या परवानग्याही तूर्तास पर्यावरण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रापाेटी रखडल्या आहेत. काही विकसकांनी एलआयजी अर्थातच लाे इन्कम ग्रुपसाठी घरे राखीव ठेवण्याच्या निर्णय लक्षात घेऊन तूर्तास बांधकाम परवानगी घेणे टाळले असावे, अशी शंका व्यक्त केली जाते.

परवानग्या का रखडल्या याचा शोध आवश्यक
^महापालिकेलाजवळपास शंभर कोटींहून अधिक महसूल मिळवून देणारा हा मार्ग आहे. मुळात यातून अनधिकृत घरांनाही आळा बसेल. या परवानग्या का रखडल्या याचाही शोध घेऊन काेणी अडवणूक करीत असेल तर ती दूर करता येईल. सुधाकरबडगुजर, विरोधीपक्षनेता, महापालिका