आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘प्रकल्प बंद पाडू’ म्हणताच यंत्रणा ताळ्यावर, सकारात्मक प्रस्ताव पाठविणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - एकलहरे येथील नाशिक औष्णिक वीज केंद्रासाठी नाशिक तालुक्यातील आठ गावांतील शेतकर्‍यांची 650 हेक्टर जमीन 1970 मध्ये संपादित करण्यात आली. या शेतकर्‍यांना अद्याप प्रकल्पग्रस्तांचे दाखले दिले गेले नाही. यासाठी जिल्हास्तरापासून मुंबईपर्यंत दरवाजे ठोठावूनही दखल न घेतल्याने संतप्त शेतकर्‍यांनी अखेर एकलहरे प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा देताच प्रशासन टाळ्यावर आले व बुधवारी शासनाला सकारात्मक प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्या उपस्थितीत झाला.

विभागीय आयुक्तांच्या दालनात विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, जिल्हाधिकारी विलास पाटील, अप्पर जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, वासंती माळी, महानिर्मितीचे मुख्य व्यवस्थापक सी. डी. सतीकोसरे, रणजित कुमार, वीज केंद्राचे नवनाथ शिंदे, अतुल लोळगे यांच्यासह एकलहरे, कोटमगाव, हिंगणवेढे, सामनगाव, देवळाली, पंचक, ओढा, शिलापूर येथील शेतकरी उपस्थित होते. आमदार जयंत जाधव यांनी जमिनी घेऊन शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडू नये व सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन केले. प्रकल्पग्रस्तांना दाखले मिळत नाही तोपर्यंत इंडिया बुल्स व एकलहरे प्रकल्पास जमीन घेण्यासाठी येऊ नये, असा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख तानाजी गायधनी यांनी दिला. रामदास डुकरे, शंकरराव धनवटे, सामनगावचे सरपंच विजय जगताप यांनी म्हणणे मांडले. विभागीय आयुक्त जाधव यांनी याबाबत सकारात्मक प्रस्ताव शासनाला पाठवू असे सांगून आमदार जाधव, शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत बुधवारी प्रस्ताव करू असे सांगितले.