आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Eklahre Thermal Power Generation Center,latest News In Divya Marathi

रेल्वेच्या वॅगनमधील कोळशाला आग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- एकलहरे औष्णिक वीज निर्मिती केंद्रासाठी मागवण्यात आलेल्‍या वॅगनमधील कोळशला सोमवारी(दि. ६) अचानक आग लागली. अग्निशमन दलाने ही आग नियत्रंणात आणली. या आगीत किती टन कोळसा जळून खाक झाला याचे मोजमाप होऊ शकले नाही. इंजिन उपलब्ध नसल्याने नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यावर दीड महिन्यापासून ही वॅगन उभी आहे.
सोमवारी सकाळी मालधक्क्यावर उभी असलेली ही वॅगन सेंट्रिंग करण्यासाठी (दुस-या ट्रॅकवर नेण्यासाठी) गेलेल्या कर्मचा-याला वॅगन गरम असल्याचे लक्षात आले. उभी वॅगन गरम होण्याची शक्यता नसल्याने या कर्मचा-यांनी वरिष्ठांना ही माहिती दिली असता अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन बंबाने पाण्याचा मारा केल्यानंतर धूर बाहेर पडला खालच्या बाजूला राख गळून पडली. या वॅगनमध्ये सुमारे ७० टन कोळसा होता. पाणी मारल्याने कोळसा खाली दाबला गेल्याने नेमका किती कोळसा खाक झाला याचा प्रशासनाला अंदाज बांधता आला नाही.

एकलहरे येथे दररोज कोळशाच्या तीन ते चार रेल्वे मालगाड्या येतात. एका गाडीला किमान 58 वॅगन असतात. कधी यापेक्षा जास्त वॅगन असल्यास त्या मालधक्क्यावर लावल्या जातात. त्यापैकी एक वॅगन मालधक्क्यावर उभी होती. एका वॅगनसाठी स्वतंत्र इंजिनची गरज असल्याने ही वॅगन तेथे थांबून होती. वॅगनला लागलेली आग नियत्रंणात आणताना अग्निशमन बंब.