आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकार टिकवण्याची व्यवस्था केली, एकनाथ खडसे यांचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - भाजपने ३० वर्षे शिवसेनेला मोठा भाऊ मानून लहान भावाप्रमाणे सहकार्य केले. आता शिवसेनेने लहान भावाची भूमिका घेत भाजपला सहकार्य करावे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल असे वाटत नाही. मात्र, काही संकट आलेच तर सरकार पाच वर्षे टिकेल अशी व्यवस्था आम्ही केली आहे, असा दावा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी केला.

खडसे यांनी नाशिक येथील ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन विविध मुद्द्यांवर संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. खडसे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाइन हे हेल्थ ड्रिंक्स असल्याचे सांगत वाइन उद्योगाला प्रोत्साहन दिले होते. वाइन आरोग्यदायी आहे, अनेक औषधांपेक्षाही वाइनमध्ये अल्कोहोलचा अंश किती कमी आहे हे आम्ही राज्यातील जनतेला पटवून देणार आहोत.
फळांपासून वाइन निर्मितीचा प्रयत्न
शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी द्राक्षांव्यतिरिक्त केळी, काजू तसेच इतर फळांपासूनही वाइनची निर्मिती कशी करता येईल याची चाचपणी केली जाईल. म्हणजेच वाइनची नव्याने व्याख्या करून ती जनतेसमोर ठेवावी लागेल, असे खडसे यांनी सांगितले.