आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाता दर दिवशी रस्त्यावरच्या मुलांची ‘एको’ दिवाळी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काही दिवसांपूर्वी धामधुमीत पार पडलेली दिवाळी आपल्या सगळ्यांच्या घरात नवीन चैतन्य घेऊन आली. मात्र, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी ही दिवाळी रोज साजरी व्हावी, अशी आशा ‘एको’ने त्यांना मिळवून दिली. काही तरुणांनी एकत्र येऊन या मुलांसाठी दिवाळीनंतर नवीन कपडे मिठाई वाटप करण्यास सुरुवात केली अाहे. दिवाळी त्यानंतर बालदिनाच्या निमित्ताने ‘एकाे’ने राबविलेल्या उपक्रमामुळे या मुलांनी अानंद लुटला.

नाशिक शहरामध्ये राज्यातून तसेच परराज्यातून अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी येतात.या नागरिकांना नाशिकमध्ये ना राहण्यासाठी घर, ना स्थैर्य. अशा बेघरांसाठी मदत करण्याचे कार्य एकाे ग्रुपचे तरुण करत अाहेत. गाेदाकाठावर राहणाऱ्या अशा बेघर कुटुंबातील बालकांना सध्याच्या कडाक्याच्या थंडीपासून बचाव करणे अपुऱ्या कपड्यांमुळे कठीण हाेत अाहे. अशा परिस्थितीत फक्त दिवाळीनिमित्त फराळ वाटप करून सण साजरा करता या बालकांची पुन्हा पुन्हा भेट घेऊन त्यांना कपडे उपयाेगी वस्तूंचे वाटप करण्यास या ग्रुपने सुरुवात केली. येत्या काही दिवसांत या मुलांना घेऊन पुन्हा दिवाळी साजरी करण्याचा बेत ‘एको’चा आहे.
या गटामध्ये लोकेश महाजन, राघवेंद्र कदडी, संकेत कपोले, आकाश टिकल, पूर्वा गोडबोले, विराज मेहता यांच्या संकल्पनेने हे काम सुरू आहे. नाशिकच्या विविध भागांमध्ये राहणाऱ्या मुलांसाठी इथून पुढेही सातत्याने काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठांसाठीही उपक्रम
नाशिकमध्येरस्त्यावर राहणाऱ्या, कष्टकरी वर्गातील मुलांसह त्यांचे पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील या संस्थेतील व्यक्ती काम करत आहेत. त्यांनाही उबदार कपडे, चांगली वस्त्रे आणि शाली देऊन काम सुरू आहे. हे काम तात्पुरते राहता इथून पुढेदेखील यापेक्षा जास्त काम करण्याची इच्छा ‘एको’च्या सदस्यांनी व्यक्त केली.

मुलांपुरते मर्यादित काम नको
^आम्हीहेकाम सुरू करताना काही काळापुरते मर्यादित ठेवता सर्व क्षेत्रात फिरून मुलांना शोधून काम सुरू ठेवणार आहोत. जेवढ्या प्रमाणात आम्हाला कपडे आणि वस्तू मिळत जातील, तेवढ्या प्रमाणात काम सुरू ठेवू. बाल दिन आणि दिवाळी हे फक्त मुलांसाठी निमित्त होते. याव्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक, विस्थापित आणि महिलांसाठी काम करणार आहोत. -संकेत कपोले, ‘एको’

संस्थेचे काम लाखमाेलाचे
आम्हीआमची संस्था रजिस्टर केलेली नाही, पण इथून पुढे काम करताना एका गटाने काम करणार आहोत. नाशिकमध्ये हे काम सुरू ठेवण्यासाठी संस्थेचे रजिस्ट्रेशन नाही, पण गट असणे महत्त्वाचे असते, हाच विचार करून ‘एको’ नावाने काम सुरू केले आहे.
बातम्या आणखी आहेत...