आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार सोडविणार उद्योजकांच्या समस्या, आमदार फरांदे, आहेर यांनी दिला शब्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील तर राहूच, शिवाय उद्योगांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करू. उद्योजकांनी त्यांच्या समस्या सोडविण्याचे मार्ग सुचवावेत. संबंधित मंत्रालयाकडे त्याचा पाठपुरावा करू, असा शब्द नवनिर्वाचित आमदार देवयानी फरांदे , डॉ. राहुल आहेर यांनी दिला.

निमा हाउस येथे उद्योजक संघटनांतर्फे आयोजित सत्कारास उत्तर देताना आमदार बोलत होते. शहरातील उ़द्योगांसाठी कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र, प्रलंबित विमानसेवेस प्रारंभ,औद्योगिक वसाहतीत ड्रेनेज, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधा, वेगाने औद्यागिक भूसंपादन, पुणे-नाशिक चौपदरीकरणातील सिन्नरजवळील भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने, ईएसआय हॉस्‍‍पीटल केंद्र सरकारकडे वर्ग करण्यासाठी पुढाकार अशा मागण्या उद्योजकांनी यावेळी केल्या.
व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष रवी वर्मा, आयमाचे अध्यक्ष विवेक पाटील, निवेकचे अध्यक्ष संदीप सोनार, निमाचे उपाध्यक्ष संजीव नारंग, चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, नि‍माचे सरचिटणीस मंगेश पाटणकर, व्हिनस वाणी आदी होते. निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, मधुकर ब्राह्मणकर, रमेश वैश्य, मनीष कोठारी, अशोक राजवाडे, लघुउद्योग भारतीचे पश्चिम प्रांतप्रमुख योगेश कनानी, सीएट नाशिक प्रकल्पाचे उपाध्यक्ष राधेशाम केडिया आदींसह अन्य उद्योजक उपस्थित होते.