आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Commission,Latest News In Divya Marathi

कुणाच्याही मदतीशिवाय करणार मतदान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- यंदा प्रथमच आयोगाने अंध मतदारांना मतदानासाठी ब्रेल लिपीत उमेदवारांची यादी उपलब्ध करून दिली आहे. परंतु, हा पहिलाच उपक्रम असल्याने ब्रेलद्वारे कसे मतदान करावयाचे याचे प्रत्यक्षात प्रात्यक्षिकही त्यांच्याकडून करवून घेण्यात आले. त्यामुळे अंध मतदारांनी कुणाच्याही मदतीशिवाय आता आम्ही मतदान करणार असल्याचा निर्धार व्यक्त करत मतदान करण्याची शपथ घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ व जिल्हा निवडणूक विभागातर्फे झालेल्या कार्यशाळेत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
मतदान जागृती निरीक्षक शुभा गुप्ता यांनी सांगितले की, यंदा जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठीच आयोगाने दृष्टिहीन मतदारांसह इतरही अपंग मतदारांसाठी केंद्रावर खास सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यात अंधांसाठी उमेदवारांची यादी ब्रेल लिपीत उपलब्ध करण्यात आली आहे. शिवाय मतदान यंत्रांवरही उजव्या बाजूला उमेदवारांचा क्रमांक ब्रेल लिपीत ठेवण्यात आला आहे. अपंगांसाठीदेखील व्हील चेअरवरील मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था करण्यात आल्याने सर्वांनी मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर या मतदारांच्या शंकांचे निरसनही या वेळी करण्यात आले.
मतदारयादीत नाव आहे. मात्र, ओळखपत्र नसल्यास आयोगाने परवानगी दिलेल्या 14 कागदपत्रांपैकी कुठलेही एक घेऊन मतदानासाठी जाण्याचे आवाहनही त्यांनी केले. या मतदारांनीही त्यास होकार देत मतदानाचा निर्धार केला. नियोजन अधिकारी प्रदीप पोतदार यांनी उपक्रमाची माहिती दिली. उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे राहुल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनिष मसराणी, निवडणूक उपजिल्हाधिकारी गीतांजली बाविस्कर आदी या वेळी उपस्थित होते.