आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election Fever On Android Cell Phone Issue At Nashik

अँड्रॉइडवरही इलेक्शन फीवर , विधानसभा निवडणुकीचे अपडेट्स स्मार्ट फोन्सवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्याने, राजकीय पक्षांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वच स्तरांवर जोरदार तयारी सुरू असताना, अँड्रॉइडचे स्मार्ट विश्वदेखील यात जराही मागे नाही. त्यामुळे स्मार्ट फोनधारकांना एका क्लिकवर निवडणुकांची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे.

अँड्रॉइडच्या प्ले-स्टोअरवर जाऊन सर्चमध्ये विधानसभा किंवा इलेक्शन २०१४ हा शब्द टाकताच आपल्यासमोर विविध अ‍ॅप्सचे पर्याय उपलब्ध होतात. त्यातून लगेचच वर दिसणारे "महाराष्ट्र इलेक्शन टुअर'सारखे प्राधान्याने दिसणारे अ‍ॅप अ‍ॅप डाऊनलोड करायचा अवकाश, आपल्याला मुख्यमंत्रिपदासाठीच्या उमेदवारांपासून ते संभाव्य उमेदवार, निवडक लेखसंग्रह असे अनेक पर्याय खुले होतात.

भारतात होणाऱ्या प्रत्येक निवडणुकांची नियमावली, वेगवेगळ्या स्तरांवरील निवडणुकांचे वेळापत्रक, तसेच राज्यकर्त्यासाठी या निवडणुकांत लागू असलेल्या विविध अटी नियमदेखील या अ‍ॅप्समधून आपल्याला जाणून घेता येतात. त्यातही काही अ‍ॅप्समध्ये मतदार यादीतून आपले नाव शोधण्याचा पर्यायदेखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

या अ‍ॅप्सचा पर्याय
गुगलप्ले-स्टोअरवर विधानसभा किंवा इलेक्शन २०१४ हा शब्द टाकला की "महाराष्ट्र इलेक्शन टुअर', माय नेता, इंडियन इलेक्शन रिझल्ट, विधानसभा, विधानसभा मैदान, राज्यकर्ता अशा अ‍ॅप्सचा पर्याय आपल्यासमोर खुला होतो. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून अनेक नेत्यांनीे ब्रँडिंगाचा प्रयत्न केला आहे. नेत्यांच्या सभा, त्या सभांचा सारांश, फोटो हे सर्वअपडेट्सही या अ‍ॅप्समधून मिळू शकतात. या अपडेट्सवर मात्र त्या-त्या पक्षाचा किंवा पक्षाच्या नियोजकांचे नियमन राहणार आहे. या अ‍ॅप्समुळे निवडणुकांचा सारा तपशील तळहाताशी येऊन ठेपला आहे.