आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रभाग 17 मध्ये 41, तर 61 मध्ये 61 टक्के मतदान; पोटनिवडणूक शांततेत; आज मतमोजणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रभाग क्रमांक 17 व 61 मध्ये रविवारी झालेल्या पोटनिवडणुकीत अनुक्रमे 41 व 61 टक्के मतदान झाले. या दोन्ही प्रभागांची मतमोजणी सोमवारी (दि. 30) होणार आहे.

प्रभाग 17 मध्ये 26 हजार 382 मतदारांपैकी 11 हजार 65 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 6 हजार 344 पुरुष, तर 4 हजार 721 महिला मतदारांचा समावेश आहे. दुपारपर्यंत संथगतीने सुरू असलेल्या मतदानाचा आकडा तीन वाजेनंतर वाढल्याने शेवटच्या टप्प्यात 41.94 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत दिनकर पाटील व सदाशिव माळी या दोन्ही माजी नगरसेवकांसह अपक्ष म्हणून सुनील शेंद्रे हे उमेदवार आहेत. सोमवारी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू होईल. साधारण दोन तासांत निकाल अपेक्षित आहे.

नाशिकरोड कार्यालयात मतमोजणी : नाशिकरोड विभागातील प्रभाग 61 मध्ये 61.94 टक्के मतदान झाले. महायुतीचे केशव पोरजे,आघाडीकडून रवींद्र हांडोरे व अपक्ष पोपटराव हगवणे यांच्यात तिरंगी लढत आहे. एकूण 14 हजार 489 पैकी 61.94 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिकरोड विभागीय कार्यालयात सोमवारी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी होणार आहे.
सकाळी 10 पर्यंत निकाल शक्य
प्रभाग 17 व 61 मधील मतमोजणी सोमवारी (दि. 30) सकाळी 8 वाजता सुरू होणार असून, साधारण दोन तासांनी म्हणजे 10 वाजेपर्यंत या पोटनिवडणुकीचे निकाल हाती येतील.