आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस राष्ट्रवादीचे इच्छुक ‘एमआयएम’च्या वाटेवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - हैदराबादयेथील मजलिस- ए- इत्तेहादुल मुसलमीनने (एमआयएम) अागामी विधानसभानिवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून, त्यासाठी उमेदवारांच्या चाचपणीचे काम पक्षपातळीवर लवकरच सुरू करण्यात येणार आहे. शहरातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नाराज इच्छुक ‘एमआयएम’च्या संपर्कात आहेत. ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या सुरुवातीला पक्षाची उमेदवारी निश्चित केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
राज्यात मुंबई, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यांसह विदर्भातील काही मतदारसंघात निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत ‘एमआयएम’चे उमेदवार विजयी झाले. त्यानंतर या पक्षाने महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढविली नाही, मात्र विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी नुकतीच केली आहे. यासाठी ओवेसी बंधूंनी रमजान महिन्यात ‘नाशिक मध्य’साठी चाचपणीही केली होती. ‘नाशिक मध्य’साठी काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस’ने उमेदवारी दिल्यास ‘एमआयएम’तर्फे निवडणूक लढविण्याच्या तयारीत काही इच्छुक आहेत. तसेच, शहरातील काही माजी नगरसेवकही ‘एमआयए’च्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, सध्या पक्षाचे शिष्टमंडळ मुंबईच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षासह अनेक नाराज बड्या नेत्यांना पक्षाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंब्रा-कळवा, भिवंडी, मालेगाव, गोवंडी अशा मुस्लिमबहुल मतदारसंघांकडे पक्षाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यापाठाेपाठ पक्षाच्या िनरीक्षकांकडे शहरातील काही इच्छुकांनी अर्जही केल्याचे समोर आले आहे.

उमेदवारी हवीच, अन्यथा...
‘नाशिकमध्य’ या मतदारसंघात मुस्लिम मतदारांचे प्रमाण िनकालावर परिणाम करण्याइतपत माेठे असल्यामुळे येथे मुस्लिम नेत्या-कार्यकर्त्यास उमेदवारी देण्याची मागणी काँग्रेसच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी केली अाहे. इच्छुकांमधील मुस्लिमांना उमेदवारी दिल्यास प्रसंगी पक्षाच्या विरोधात उमेदवारी करणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.