आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवार तेच, फक्त पक्ष बदलले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रभाग क्रमांक 17 ची पोटनिवडणूक पुन्हा चुरशीची होणार असल्याचे संकेत अर्ज दाखल करण्याच्या दिवशी मिळाले. या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसकडून निवडणूक लढविणारे दिनकर पाटील या वेळी महायुतीकडून, तर त्यांच्यासमोर सर्वत्र आघाडी असतानाही मैत्रीपूर्ण लढतीच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडून गेल्या वेळी लढलेले माजी नगरसेवक सदाशिव माळी हे आता कॉँग्रेसकडून रिंगणात आहेत.
कॉँग्रेस नगरसेवक दिनकर पाटील हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी बसपात गेल्याने त्यांना नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे येथे पोटनिवडणूक होत असून, येत्या 29 तारखेला मतदान आहे. आता पाटील भाजपात गेले आहेत, तर राष्ट्रवादीच्या सदाशिव माळी यांनी मात्र आश्चर्याचा धक्का देत कॉँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे.
कॉँग्रेसमध्ये पाटील विरोधी गट सक्रिय असल्याचे माळी यांच्या उमेदवारीच्या यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी दिनकर पाटील, सदाशिव माळी, गतवेळचे शिवसेनेचे उमेदवार साहेबराव जाधव, सुनील शेंद्रे व कोळप्पा धोत्रे यांनी अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, निष्ठावंतांना डावलून इतरांना उमेदवारी दिल्याने तसेच ही जागा शिवसेनेची असताना भाजपला सोडण्याचे कारणच काय, असा सवाल करत मी निवडणूक लढणारच असल्याचे साहेबराव जाधव यांनी स्पष्ट केले.