आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election News In Marathi, Order For Daily Report Of Banners, Divya Marathi

दररोज अहवाल द्या ,अधिकारी, पोलिस अधिकार्‍यांना त्यांनी सूचना केल्या.

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणूक खर्चावरील नियंत्रणासाठी सोशल मीडियासह सार्‍या गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या पाच पथकांना रोजच्या रोज अहवाल सादर करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकार्‍यांनी गुरुवारी दिले. नियोजन भवनात निवडणुकीशी संबंधित
स्फोटक पदार्थांच्या साठय़ांवर निवडणूक काळात सील लावत नियमित तपासणीसाठी तहसीलदार व पोलिस निरीक्षकांनी भेट द्यावी, नव्याने आलेल्या अधिकार्‍यांनी विधानसभा कार्यक्षेत्रात भेट देण्याच्याही सूचना केल्या.
तीन भरारी पथके
तिन्ही लोकसभा मतदारसंघांत भरारी पथकांत दंडाधिकारी दर्जाचा अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, निवडणूक अधिकारी यांच्यासह व्हीडिओग्राफरही असेल. मतदारांना प्रलोभने, पैसे देण्याच्या प्रकारावर ते नियंत्रण ठेवतील. ते गुरुवारपासून कार्यरत झाले असून, आवश्यकतेनुसार त्यात वाढही करता येईल. त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था पथक, सांख्यिकी निगराणी पथक नेमले जाईल.
नाशिक । लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहर आणि परिसरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे होर्डिंग व बॅनर काढून टाकण्यासाठी गुरुवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची दिवसभर धावपळ सुरू होती.
दिवसभरातून या पथकांनी शहरातून जवळपास एक हजार होर्डिंग, बॅनर महापालिकेने जप्त केले. बुधवारी आचारसंहिता लागू झाल्यानंतर तत्काळ मोठी कारवाई झाली नव्हती. दुसर्‍या दिवशी मात्र पथके नेमून प्रचार साहित्य जप्त केले. सर्वाधिक 751 बॅनर, 44 होर्डिंग, 25 बोर्ड, तर विविध राजकीय पक्षांचे 219 झेंडे जमा करण्यात आले.
4191 मतदार केंद्रे
4 हजार 191 मतदारकेंद्रांपैकी नाशिकमध्ये 1664, दिंडोरी 1750 आणि धुळ्े मतदारसंघात 777 केंद्र आहेत. मतदान यंत्रेही पुरेशी असून, 4 हजार 610 कंट्रोल युनिट, तर तेवढीच बॅलेट युनिटची गरज आहे. त्या तुलनेत जिल्ह्यात 6767 बॅलेट आणि 5684 कंट्रोल युनिट तपासून तयार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. शिवाय 1394 अतिरिक्त यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
37, 98, 625 मतदार
नाशिक जिल्ह्यात असलेल्या 15 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 37 लाख 98 हजार 625 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यात नाशिक मतदारसंघात 15 लाख 45 हजार 564 मतदारांचा समावेश आहे. दिंडोरीत 15 लाख 2 हजार 35 आणि धुळे लोकसभेच्या नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात 7 लाख 51 हजार 26 मतदार आहेत. छायाचित्र मतदारयादीबरोबर ओखळपत्राचे प्रमाण 94.52 टक्के आहे.