आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Election News In Marathi, Registered Your Name Undef Be Constituent , Divya Marathi

‘बना मतदार’ मोहिमेतून साधा नावनोंदणीची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यापूर्वी आर्ट ऑफ लिव्हिंग आणि ‘दिव्य मराठी’ यांनी एकत्रितरीत्या महाविद्यालयांत राबविलेल्या ‘बना मतदार’ या मतदार नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुन्हा एकदा मतदारांना नावनोंदणीसाठी दोन्ही संस्थांच्या वतीने प्रोत्साहित करण्यात येत आहे. यात नाव नोंदणी अर्ज भरण्यापासून विविध बाबींचे नावनोंदणी केंद्रावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या मोहिमेमध्ये नवमतदारांना 15 मार्चपर्यंत आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याची संधी प्राप्त झाली आहे. मात्र, त्यासाठी 1 जानेवारी 2014 पर्यंत 18 वर्षे वय पूर्ण झालेल्यांनाच आपले नाव नोंदविता येईल. शिवाय, ज्यांचे नाव यादीतून गहाळ झाले आहे, त्यांनाही नव्याने नाव नोंदणीसाठी अर्ज करावा लागणार आहे.
यंदा निवडणूक आयोगाने अधिकाधिक मतदारांची नोंदणी करण्याबरोबरच मतदानाच्या टक्केवारीत वाढ व्हावी यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार 9 मार्च हा विशेष मतदार नोंदणी आणि तपासणी दिवस ठेवण्यात आला आहे. या दिवशी नागरिकांना आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर मतदारांना नाव तपासणीसाठी मतदारयादी उपलब्ध राहणार असून, बीएलओही उपस्थित राहणार आहेत. मात्र, यात कोणाचेही नाव यादीतून वगळले अथवा दुरुस्त केले जाणार नसून, कारकुनी चूक असल्यास संबधिताला त्याच्याजवळील ओळख पुराव्यानुसार मतदान करू देण्याची अनुमती दिली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितले. याचबरोबर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदारांना नाव शोधता येणार आहे.