आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप शहराध्यक्षपदाची अाज निवडणूक; तिघांमध्ये स्पर्धा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी संघाच्या निष्ठावंत स्वयंसेवक दादाजी जाधव यांच्या नियुक्तीपाठाेपाठ पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अाता शनिवारी हाेणाऱ्या शहराध्यक्षपदाच्या निवडीकडे लक्ष लागले अाहे. या पदासाठी माजी अध्यक्ष विजय साने, सुरेशअण्णा पाटील सुनील केदार यांच्यात स्पर्धा अाहे.

‘वसंतस्मृती’ या भाजपच्या कार्यालयात शनिवारी (दि. १६) दुपारी वाजता उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशाेर काळकर, निवडणूक निरीक्षक उदय वाघ, निरीक्षक संभाजी पगारे, सहनिवडणूक अधिकारी प्रशंात जाधव यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार अाहे. सिडकाे मंडलाच्या निवडीवरून थेट शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर विद्यमान अामदारांनी जाहीर अाराेप केल्याने प्रदेशाध्यक्षांपर्यंत हा वाद पाेहोचला अाहे. त्यापाठाेपाठ जिल्हाध्यक्षपदासाठी मातब्बर नावे पुढे अाली असतानाच, निष्ठावंत अाणि उपरे असा वाद निर्माण होऊन निष्ठावंताच्या गळ्यात माळ पडली. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठीही ताेच निकष लावला जाणार असल्याच्या चर्चेने इच्छुकांना धुमारे फुटले अाहेत. त्यात पक्षाच्या पडत्या काळातही एकनिष्ठ राहिलेल्या विजय साने, सुनील केदार, गाेपाळ पाटील यांची नावे पुढे अाली, तर काही वर्षांपासून पक्षात सक्रिय सुरेशअण्णा पाटील, सुनील अाडके यांचीही नावे चर्चेत अाहेत. अखेरीस गेल्या निवडणुकीप्रमाणेच इच्छुक अापल्या नियुक्तीवर ठाम राहिल्यास एेनवेळी विद्यमान अामदार बाळासाहेब सानप यांच्याही गळ्यात शहराध्यक्षपदाची माळ पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.