आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस अाघाडीवर शिक्कामाेर्तब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रभाग समिती सभापतिपदाची निवडणूक अाता रंगात अाली असून, गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असणार अाहे. दरम्यान सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काॅंग्रेसची अाघाडीवर शिक्कामाेर्तब झाले असून, त्यांनी पक्षीय बलाबल लक्षात घेता नाशिकराेडचा विचार साेडल्यामुळे युतीची अप्रत्यक्षरीत्या बाेहणी झाल्याचे चित्र अाहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेरचे वर्ष असल्यामुळे यंदा प्रभाग समिती सभापतीची निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची ठरली अाहे. खासकरून सत्ताधारी मनसेला नाराजांना न्याय देण्यासाठी ही समिती महत्त्वाची वाटत हाेती, मात्र मध्यंतरी पक्षातील जवळपास सात ते अाठ नगरसेवकांनी मनसेला रामराम केल्यावर अाता प्रभाग समिती निवडणुकीवर या बंडखाेरीचे सावट अाहे. या पार्श्वभूमीवर मनसेने सावध पवित्रा घेत रणनीती अाखण्यास सुरुवात केली अाहे. तूर्तास काॅंग्रेस, राष्ट्रवादी, अपक्षांबराेबरील महाअाघाडी कायम असून, महापाैरांच्या ‘रामायण’ या निवासस्थानी नाशिकराेड वगळता पाच विभागांसाठी काेणी उमेदवार करायची याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

नाशिकराेडमध्ये शिवसेना भाजपचे संख्याबळ माेठे असल्यामुळे तसेच अातापर्यंत येथे युतीला थाेपवण्यात अालेले अपयश लक्षात घेत उमेदवारीत शक्ती खर्च करू नये, यावर एकमत झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी दुपारी वाजेची मुदत असून, काेण काेण उमेदवारी अर्ज दाखल करते हे बघणे महत्त्वाचे ठरणार अाहे.

पंचवटी,सातपूर मनसे तर राष्ट्रवादी, काँग्रेस, अपक्षाकडे प्रत्येकी एक : महाराष्ट्रनवनिर्माण सेनेने सातपूर, पंचवटी नाशिक पूर्व प्रभाग समितीसाठी दावा केला अाहे. यापूर्वी पंचवटी सातपूर मनसेला पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न अाहे. यात सातपूर अाता मनसेकडे असून, पंचवटी राष्ट्रवादीकडे अाहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सातपूर, काँग्रेस सिडकाे, तर अपक्षांनी पंचवटी नाशिक पूर्व या दाेघांवर दावा केला अाहे.